Advertisement

मराठा समाज भूषण मराठायोद्धा गजानन हरणे यांचा सत्कार संपन्न

मराठा समाज भूषण मराठायोद्धा गजानन हरणे यांचा सत्कार संपन्न
प्रतिनिधी बाळासाहेब नेरकर
अकोला जिल्हा परिषद नगर खडकी येथील रहिवासी व अकोला जिल्ह्यातील ज्येष्ठ समाजसेवक , संयोजक, निर्भय बनो जनआंदोलन तथा मराठा समाज भूषण मराठायोद्धा गजानन ओंकारराव हरणे यांच्या गेल्या 30 वर्षाची सामाजिक कार्याची दखल घेऊन व यांनी मराठा समाजासाठी केलेल्या कार्याबद्दल, त्यागाबद्दल व त्यांनी केलेल्या उपोषणामुळे समाजात नवचैतन्य व जागरूकता निर्माण झाल्यामुळे समाजासाठी केलेल्या त्यागासाठी मराठा समाज भूषण मराठायोद्धा समाजसेवक गजानन हरणे यांचा देशमुख मंगल कार्यालय डाबकी रोड अकोला येथे वधू वर सूचक परिचय मेळावा मध्ये भव्य दिव्य सत्कार करून गौरव, सन्मान भागवताचार्य समाजभूषण हभप ज्ञानेश्वर महाराज वाघ यांच्या शुभहस्ते शाल श्रीफळ पुष्पगुच्छ सन्मानपत्र देऊन सत्कार गौरव करण्यात आला. 
         रविवारी दुपारी स्थानिक डाबकी मार्गावरील देशमुख मंगल कार्यालयामध्ये आयोजित या पाटील समाज वर-वधू परिचय मेळाव्यामध्ये हा सत्कार समारंभ हभप ज्ञानेश्वर महाराज वाघ , व्यासपीठावर ज्येष्ठ समाजसेवक महादेवराव भुईभार, पाटील समाज वर-वधु सुचक मंडळाचे अध्यक्ष माजी सैनिक सुभाषराव म्हैसने, कार्याध्यक्ष डॉ. अशोक ओळंबे, अशोक अमानकर, अन्नपूर्णेश पाटील, विवेक पारसकर, डॉ. रणजीत पाटील, डॉ. अमोल रावणकर, संग्राम गावंडे, संजय चौधरी, पंकज साबळे, रजनीश ठाकरे, पंकज गावंडे, जगदीश मुरूमकर, अशोक पटोकार, पंकज जायले, रमेश टिकार, राजेश काळे, डॉ. सुधीर ढोणे, मंगेश काळे, सौ. मंगला म्हैसणे, सौ. ज्योत्स्ना चोरे, सौ. सुषमा निचळ, सौ. सुनीता ताथोड, सौ. सविता आढाव, शोभा भरणे, प्रा. डी. ए. पाटील, मनोज पाटील, मंचितराव पोहरे, सौ. सुषमा बाठे, गुणवंत जानोरकर, वाहूरकर गुरुजी, माणिकराव गावंडे, तुळशीराम भरणे, दिनकर सरप यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविकात मंडळाचे अध्यक्ष सुभाष म्हैसने यांनी केले. या वर-वधू परिचय मेळाव्याला अकोला जिल्ह्यासह आजूबाजूच्या जिल्ह्यांमधून उपवर-वधूंसह त्यांचे पालक तसेच समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ॲड. संतोष गोळे, दिलीप बढे, सुभाष पागृत, प्रा. देवलाल उजाडे, सौ. वैशाली गावंडे, सौ. वंदना बढे, सौ. ज्योती गोळे, सौ. सविता गोळे, सौ. संगीता मांगटे, चंद्रकांत ताठे, वसंतराव पोहरे, गणेश चितोळे, विजय दांदळे, वसंतराव उजाडे, चंद्रशेखर वानखडे, डॉ. तेजराव नराजे, गजानन माळी, गजानन धोटे, हिम्मतराव पोहरे, प्रभाकर ठाकरे अशोक भिलकर, वसंत माळी, योगीराज सरोदे, पुरुषोत्तम सांगूनवेढे, संतोष दुतोंडे, राहुल वानखडे, मोहन मानकर, सुनील उपाध्याय, गोपाल उगले, संजय भांबेरे, श्याम खोटरे नरेंद्र घोम, दिगंबर खवले, नंदू खोटरे, गजानन टिपरे, अरुण खोटरे, दीपक भाकरे, संतोष ठाकरे, सचिन तायडे, विलास वानखडे, डॉ. सुभाष बढे, मोहन शेळके, संतोष आखरे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन गणेश पाथ्रीकर गुरुजी व सौ. स्वाती मंगेश कडाळे यांनी केले तर आभार प्रदर्शन कार्याध्यक्ष डॉ. अशोक ओळंबे यांनी केले. यावेळी समाजासाठी विशेष कार्य करणाऱ्या योगदान देणाऱ्या समाजसेवक गजानन हरणे यांच्या सोबतच समाजा साठी काम करणारे पोलीस अधिकारी राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त पोलीस निरीक्षक अशोक लांडे, एसीबी वाशिम पोलीस निरीक्षक गजानन शेळके, मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे गजानन हरणे यांचे सह सौ. प्रतिभा काटे यांचा सुद्धा विशेष व उल्लेखनीय कार्यासाठी हभप ज्ञानेश्वर महाराज वाघ यांचे शुभ हस्ते शाल, श्रीफळ व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेच आपल्या मुला-मुलींचे विवाह ठरलेल्या वेळेवर लावणारे समाज बांधव श्याम मते पाटखेड, किशोर दुतोंडे सोमठाणा, अशोक नराजे हिंगणी बु. यांचा सुद्धा यावेळी शाल श्रीफळ व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थितती होती.

Post a Comment

0 Comments