Advertisement

श्री अंबिका देवी विद्यालयाच्या गुणवंत विद्यार्थ्यांना बायोस्टेड इंडिया लिमिटेड च्या वतीने शिष्यवृत्तीचे वाटप

श्री अंबिका देवी विद्यालयाच्या गुणवंत विद्यार्थ्यांना बायोस्टेड इंडिया लिमिटेड च्या वतीने शिष्यवृत्तीचे वाटप
बाळासाहेब नेरकर कडुन
तेल्हारा- तालुक्यातील सौंदळा येथील श्री अंबिका देवी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मध्ये शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मधील वर्ग नववीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना बायोस्टेट इंडिया लिमिटेड या कंपनीद्वारे शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले,त्याच बरोबर तालुक्यातील प्रगतशील शेतकऱ्यांना कृषी सन्मान पुरस्काराने गौरविण्यात आले.

कंपनीद्वारे दरवर्षी भारतातील तब्बल ४००० विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात येतो. वर्ग नववीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना बायोझाईम प्रगती शिष्यवृत्ती देण्यात येते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक श्री रमेशजी पुंडकर सर होते तर श्री योगेशदादा टोहरे, संचालक ,वृषाली कृषी केंद्र व इलेक्ट्रीकल हिवरखेड यांची प्रमुख उपस्थिती होती. 
तसेच प्रमुख अतिथी म्हणून बायोस्टेट इंडिया लिमिटेड कंपनीचे फिल्ड मार्केटिंग मॅनेजर श्री सानिकेत आलिम,
अकोला जिल्हा प्रभारी श्री दिनेश गावंडे तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री रमेशजी ठाकरे सर उपस्थित होते ,श्री सानिकेत यांनी विद्यार्थ्यांना कृषी क्षेत्रात आपले करियर कसे घडवायचे याबद्दल मार्गदर्शन केले व शेती विषयक माहिती दिली.श्री दिनेश गावंडे यांनी कंपनीच्या उत्पादन व गुणवत्तेबाबत माहिती दिली तर योगेश टोहरे यांनी कंपनीच्या या विद्यार्थी उपयोगी शिष्यवृत्तीबाबत बायोस्टेट कंपनीचे आभार मानले व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी पंचक्रोशीतील प्रगतिशील शेतकऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री महेंद्र कराळे सर यांनी केले,कार्यक्रमास शिक्षक ,विद्यार्थी व शेतकरी बंधू उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments