जळगांव जा.प्रतिनिधी:- नागेश भटकर
तालुक्यातील मानेगाव शिवारातील पूर्णा नदी पात्रामध्ये अज्ञात तरुणाचा मृतदेह तरंगत असल्याने खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच मानेगाव पोलीस पाटील प्रमोद श्रीनाथ यांनी तरुणाचा मृतदेह तरंगत असल्याची माहिती पोलीस स्टेशनला दिली असता घटनास्थळावर ठाणेदार दिनेश झांबरे यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग इंगळे पोलीस उपनिरीक्षक विर यांनी घटनास्थळावर जाऊन मोठ्या मेहनतीने त्या पूर्णा नदी पात्रातील पाण्यावर तरंगत असलेल्या तरुणाचा मृतदेह मोठ्या बाहेर काढला. मृतदेह बाहेर काढताच दुर्गंधी येणे सुरू झाले होते. त्या तरुणाचा मृतदेह जवळपास तीन ते चार दिवसापासून नदीपात्रात पडलेला असावा असे दिसून येत होते. मृतदेह आणताना अवकाळी पाऊस पडल्यामुळे रस्त्यावर मोठा चिखल झाला होता अशा परिस्थितीत पोलिसांनी जळगाव जामोद येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये त्या अनोळखी तरुणाचा दुर्गंधीयुक्त मृतदेह आणण्यात आला होता. डॉक्टरांनी त्या अनोळखी मृतदेहाचे शवविच्छेदन केले. मृतदेह एवढा विक्षिप्त झाला होता की त्याला ओळखणे सुद्धा कठीण झाले होते. सदर अनोळखी तरुण हा 25 ते 30 या वयाचा असू शकतो असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. जळगाव जामोद पोलिसांनी दिनांक 9 एप्रिल 2023 रोजी मर्ग नं 22/2023 दाखल केला असून त्या मृतक अनोळखी तरुणाच्या अंगामध्ये हिरव्या कलरचे शर्ट व ग्रे रंगाची पॅन्ट परिधान केली होती. परंतु गेल्या सहा महिन्यापासून त्या व्यक्तीचे कोणतेही नातेवाईक अद्याप पर्यंत आले नाहीत.अशा वर्णनाच्या व्यक्तीस जो कोणी ओळखत असेल त्यांनी जळगाव जामोद पोलीस स्टेशनची संपर्क साधावा असे आवाहन जळगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार दिनेश झांबरे यांनी केले. या घटनेचा पुढील ठाणेदार दिनेश झांबरे यांच्या मार्गदर्शनात जळगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अमोल पंडित करीत आहेत.
0 Comments