तीस वर्षीय महिलेने केली विष प्राशन करून आत्महत्या...
जळगांव जा.प्रतिनिधी:- नागेश भटकर
जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या वडगाव गड येथील एका तीस वर्षीय महिलेने विष प्राशन करून घेत आत्महत्या केल्याची खळबळजबळ घटना घडली आहे सविस्तर असे की प्रीती मनोहर मोरखडे वय 30 वर्ष
ही रात्री तिच्या आई-वडिलांसह गावातील घरी झोपली होती. रात्री कोणालाही काही न सांगता उठून ती शेतातील घरात निघून गेली होती वतीने रात्रीच विषारी औषध प्राशन केले.दिनांक 2 नोव्हेंबर च्या सकाळी तिच्या आई-वडिलांनी तिचा शोध घेतला असता ती शेतातील घरामध्ये बेशुद्ध अवस्थेत मिळून आली. प्रीती हिला नातेवाईकांच्या मदतीने ग्रामीण रुग्णालय जळगाव जामोद येथे उपचारार्थ आणले असता वैद्यकीय अधिकारी यांनी तिला तपासून मृत घोषित केले. सदर घटनेचा प्राथमिक तपास पीएसआय अमोल पंडित व पोलीस कॉन्स्टेबल स्वप्निल झुंजारकर यांनी केला. यावेळी डॉक्टरच्या मेडिकल मेमो वरून जळगाव जामोद पोलिसांनी मार्ग दाखल केला पुढील तपास ठाणेदार दिनेश झांबरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस करीत आहे.
0 Comments