प्रतिनिधी
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सपुर्ण राज्यभर विविध ठिकाणी शांततेच्या मार्गाने सुरु असलेले उपोषणे, साखळी उपोषणे व आन्दोलने शिवसेना तालुका व शहर च्या वतीने जाहीर पाठींबा देण्यात आला.
जळगाव जामोद उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालया समोर सुरु असलेल्या साखळी उपोषणाला आज शिवसेना संघटणेच्या शिष्टमंडळाने भेट देउन आपले पाठींबा पत्र साखळी उपोषणाकरीता बसलेले पदाधिकारी यांचेकडे सपुर्द केले.
मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण आणी इतरही ठिकाणी होणारे उपोषणे हे राज्य सरकारने हलक्यात घेउ नये व मराठा समाजाच्या मागण्या तात्काळ निकाली काढाव्यात.
मराठा तरुणावर जे कलमे आंदोलना दरम्यान लावली आहेत ते रय करावीत, अशी मागणी शिवसेना तालुकाप्रमुख अजय पारस्कर यांनी केली.
यावेळी बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष देविदास घोपे, तालुका उपाध्यक्ष संतोष भाकरे, नकुल यादगिरी, उप तालुकाप्रमुख युवा सेना संजय खूपसे शाखाप्रमुख धानोरा राजू हूरसोळे सरपंच गोळेगाव, अनंता झाल्टे विभाग प्रमुख, यांची यावेळी उपस्थिती होती.
0 Comments