Advertisement

मलकापूर शहर पोलीस स्टेशनची कारवाई २ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

मलकापूर शहर पोलीस स्टेशनची कारवाई २ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे

मलकापूर मोटर सायकल चोरणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळीत त्यांच्याकडून ५ मोटार सायकली अंदाजे किंमत २ लाख ६० हजाराचा मुद्देमाल शहर पोलिसांनी जप्त केल्याची कारवाई ७ नोव्हेंबर रोजी केली.याबाबतची माहिती अशी की, ६ सप्टेंबर २०२३ रोजी अनिल चुगवानी रा. सिंधी कॉलनी यांनी त्यांची मोटार सायकल क्र. एमएच २८ एवाय ९७१५ अंदाजे कि. ३० हजार रू. चोरी गेल्याची तक्रार दाखल केल्यावरून अप.क्र.४५७/२०२३ कलम ३७९, ३४ भादंवीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर मोटार सायकल चोरीचा व अज्ञात चोरट्याचा तपास करीत असतांना शेख साबीर शेख अहेमद रा.सायकलपुरा व शेख नदिम शेख नईम रा. अहमदशहापुरा पारपेठ यांनी एक मोटार सायकल चोरी केलेली असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी दोन्ही आरोपींना त्यांच्या घरून चोरीच्या मोटार सायकलसह ताब्यात घेतले. त्यांचेकडून २ स्प्लेंडर गाड्या, १ सिडी डिलक्स, १ पल्सर, १ डबल एस अशा ५ मोटार सायकली अंदाजे कि. २ लाख ६० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक सुनिल कडासने, अप्पर पोलीस अधिक्षक खामगाव अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी मलकापूर देवराम गवळी, पोलीस निरीक्षक विलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डि.बी.पथकाचे सपोनि. करुणाशील तायडे, नापोकाँ सुपेश झाल्टे, आसिफ शेख, पोका ईश्वर बाघ, पोका प्रमोद राठोड, पोका. प्रविण गवई, पोका संतोष कुमावत, पोकॉ गोपाल तारुळकर यांनी केली.

Post a Comment

0 Comments