जळगाव जामोद तालुक्यातील खेर्डा खुर्द येथील सहा वर्षाच्या मुलीवर बलात्कार
सहा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर एका पन्नास वर्षाच्या इसमाने केला बलात्कार आरोपी फरार जळगाव जामोद दि 20:तालुक्यातील खेर्डा खुर्द गावात सहा वर्षाच्या मुलीवर 50 वर्षीय इसमाने खाऊचे आमिष देऊन आपल्या राहत्या घरी 6 वर्षाच्या मुलीला बोलावून बलात्कार केल्याची घटना दिनांक 19 नोव्हेंबर रोजी दुपारी 11 ते 11:30 च्या दरम्यान घडली या गुन्ह्याची फिर्याद मुलीच्या आईने जळगाव जामोद पोलीस स्टेशनला दिली फिर्यादीत असे नमूद केले आहे आरोपी विठ्ठल समाधान दामोदर वय अंदाजे 50 वर्षे याने माझ्या मुलीला त्याच्या राहत्या घरी खाऊचे अमिष देऊन बोलावले व तिच्यावर बलात्कार केला आहे जर याबद्दल तू कुणाला सांगितले तर तुला जिवाने मारून टाकीन अशी धमकी दिली या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करुन कलम376,376(अ)(ब)506, सह कलम 4,8 ,12 बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण या नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास डी वाय एस पी देवराम गवळी यांच्या मार्गदर्शनात पीएसआय रंजना आवारे करीत आहेत
0 Comments