Advertisement

गजानन हरणे यांच्या अन्नत्याग सत्याग्रहाचा चौथा दिवशी जनतेचा प्रचंड प्रतिसाद

गजानन हरणे यांच्या अन्नत्याग सत्याग्रहाचा चौथा दिवशी जनतेचा प्रचंड प्रतिसाद      
प्रकृती चिंताजनक डॉक्टरांनी भरतीय होण्याचा सल्ला दिला मुक्या बहिऱ्या शासनाला जागृत करण्याकरीता महिला मंडळाचे भजन आंदोलन शासनाच्या जीआरची होळी. उद्या मुंडन आंदोलन.   

  बाळासाहेब नेरकर कडुन

    अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर गेल्या चार दिवसापासून मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ मराठायोद्धा गजानन हरणे ज्येष्ठ समाजसेवक तथा संयोजक निर्भय बनो जन आंदोलनचा अन्नत्याग सत्याग्रहाच्या चौथा दिवशी जिल्ह्यातील अनेक सामाजिक राजकीय संघटनांनी मोठ्या प्रमाणात पाठिंबा देऊन जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन शासनाला मराठा आरक्षणासाठी बसलेल्या उपोषण करणाऱ्या मराठा योद्धांची त्वरित दखल घ्यावी अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे. तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयाचे डॉक्टरचे टीम उपोषणकर्त्याची तपासणी करून तब्येत बरोबर नसल्याचे सांगून भरती होण्याचा सल्ला दिला होता तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाचे सुद्धा पत्र देऊन उपोषण सोडवण्याविषयी विनंती करण्यात आली होती पोलीस यंत्रणे सुद्धा लवकरात लवकर उपोषण सोडवण्याविषयी उपोषण करते गजानन हरणे यांना सल्ला दिला परंतु तो सल्ला उपोषण करते गजानन हरणे यांनी सन्मानपूर्वक नाकारून मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करा अन्यथा हे उपोषण आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशारा दिला. यावेळी मराठा समाजाच्या महिलांनी एकदिवसीय साखळी उपोषण धरने आंदोलन तसेच भजन आंदोलन करून मुक्या बहिऱ्या आंधळ्या शासनाला जागृत करण्याचे काम या आंदोलनाच्या माध्यमातून केले. प्रचंड मोठ्या संख्येने महिलांनी उपस्थित राहून शासनाचा निषेध केला. आज माजी आमदार गजानन दाळू गुरुजी , बाळापूरचे माजी नगराध्यक्ष तथा आमदार नथोकोदी खतीब साहेब,माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया आमदार विप्लो बाजोरिया माझी महापौर मदन भरगड, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ता कपिल ढोके दिलीप आसरे जिल्हा परिषद चे माजी सभापती लाखूआप्पा लंगोटे गोपी अण्णा चाकर विठ्ठल गाडे मनसेच जिल्हाध्यक्ष राजेश काळे मनसे च्या महिला जिल्हाध्यक्ष कल्पना बिडवे शिवसेनेच्या जोशनाताई चोरे देवश्री ठाकरे माजी महापौर उज्वलाताई देशमुख सौ रंजना हरणे राजश्री देशमुख देशमुख महिला मंडळाचे अध्यक्ष रूपालीताई वाकोडे माझी जि प उपाध्यक्ष निर्भय बनो जन आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद धर्माळे माजी उपमहापौर निखिलेश दिवेकर ब्राह्मण समाज शिष्टमंडळाचे डॉक्टर विश्वनाथ गोळे महाराष्ट्र भाजप प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर योगेश शाहू संजय खांडेकर क्षत्रिय मराठा दखनी समाजचे तथा ज्येष्ठ पत्रकार ,डॉ.रवी कोकाटे सरपंच परंडा, ज्येष्ठ साहित्यिक लेखक डॉक्टर ममता इंगोले आदी मान्यवरांनी भेटी देऊन मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला. आज जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन उपोषण करते गजानन हरणे यांच्या उपोषणाला जाहीर पाठिंबा दिला त्यामध्ये रुक्मिणी महिला मंडळ मलकापूर ,गुड मॉर्निंग पथक जुने शहर अकोला माजी सैनिक संघटना क्षत्रिय मराठा समाज संघटना देशमुख समाज महिला संघटना सरपंच संघटना मानव विकास मंच ब्राह्मण समाज संघटना महाराष्ट्र नवनिर्माण सेना समाजवादी पार्टी बहुजन समाज पार्टी सकल मराठा महिला समाज संघटना युवा क्रांती सेना महाराष्ट्र क्षत्रिय मराठा जखमी समाज अकोला जिल्हा अखिल भारतीय मराठा महासंघ महिला शाखा आक्रोश युवक संघटना निर्भय बनो जन आंदोलन अकोला जिल्हा अखिल महाराष्ट्र देशमुख मराठा पाटील कुणबी संघटना महिला महामंडळ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघ आदी विविध राजकीय सामाजिक संघटनांनी या उपोषणाला पाठिंबा देऊन शासनाचा निषेध केला व या उपोषणाची मराठा आरक्षणाची शासनाने त्वरित दखल घ्यावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आज दुपारी महाराष्ट्र शासनाने काढलेल्या जीआर ची होळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आली आजच्या आंदोलनाचे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण मंडप महिलांनी प्रचंड भरलेला होता. उद्या मंडळ आंदोलन व धारणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments