Advertisement

जळालेले रोहित्र (DP) त्वरित दुरुस्त करून घ्या अन्यथा ठिय्या आंदोलन करण्यात येईल

जळालेले रोहित्र (DP) त्वरित दुरुस्त करून घ्या अन्यथा ठिय्या आंदोलन करण्यात येईल..!
प्रतिनिधी जळगाव जामोद 
पिंपळगाव काळे:- गेल्या वीस दिवसापासून पिंपळगांव काळे सर्कल मधील  विद्युत रोहित्र (DP) बंद आहे. जळालेले आहेत या वीस दिवसाच्या कालावधीत वीज अभावी पिकांना पाणी न मिळाल्याने पिकांवर रोगराई येत असून पाण्या अभावी पिके वाळत आहे.
 शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे तरीही त्वरित पिंपळगांव काळे सर्कल मधील जळालेले विद्युत रोहित्र दुरुस्त करून देण्यात यावे किंवा नवीन विद्युत रोहित्र बसविण्यात यावे

अन्यथा आपल्या कार्यालयात दि:- २०/११/२०२३ सोमवार ला लोकशाही पद्धतीने ठिय्या आंदोलन करण्यात येईल या आंदोलनात काही अनुचित प्रकार व अघटित काही घडले तर त्याला सर्वस्वी म.रा.वि.वि.कं.मर्या वितरण केंद्र पिंपळगांव काळे. जबाबदार राहील. अश्या स्वरूपाचे निवेदन आज म.रा.वि.वि.कं.मर्या वितरण केंद्र पिंपळगांव काळे यांना देण्यात आले निवेदन देत्व वेळी वंचित चे युवा नेते प्रकाश भिसे, अनिल भोपडे, शाबिर देशमुख इ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments