Advertisement

वरवट बावनबिर रस्त्याचे काम सुरु असताना वाहन चालकासह स्थानिक व्यापाऱ्यांना डोकेदुखी; बांधकाम विभागाचे चक्क दुर्लक्ष

वरवट बावनबिर रस्त्याचे काम सुरु असताना वाहन चालकासह स्थानिक व्यापाऱ्यांना डोकेदुखी; बांधकाम विभागाचे चक्क दुर्लक्ष
वरवट प्रतिनिधी
दणका बातमी संग्रामपूर तालुक्यामधील मध्यस्थी ठिकाण असलेले वरवट बकाल ते बावनबीर व टुनकी महामार्ग रस्त्याचे काम चालू असून सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत . काम सुरू असताना संबंधित ठेकेदाराचे काम' चुकार कोणामुळे रोड वरून ये जा करणाऱ्या छोट्या मोठ्या वाहन चालक तसेच स्थानिक व्यवसायिक लोकांना सुद्धा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. सध्या या आठवड्यात सतत पाऊस सुरू असल्याने रस्त्याची साईटची अक्षरश:चाळण "चिखल" झाली आहे. बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रस्त्याच्या साईटकडे साचलेल्या पाण्यात मुरूम टाकून व्यवसायिकाची डोकेदुखी कमी करावी आणि रोडवर चालू असलेल्या कामासाठी सुरक्षा फलक व दिशा फलक सुद्धा लावण्यात आली नाही रात्री बे रात्री येणाऱ्या जाणाऱ्यांना खूप मानसिक त्रास सहन करावा लागतो तसेच रोड उघडलेले असल्यामुळे काही मोटरसायकल घेऊन ये जा करणारे लोक सुद्धा या अंधारामध्ये फलक नसल्यामुळे पडलेले व त्यांना किरकोळ किरकोळ सुद्धा मार लागलेला होता तरीसुद्धा बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी आतापर्यंत यावर कोणत्याच प्रकारचे कारवाई सुद्धा केलेली नाही त्यामुळे विविध प्रकारच्या समस्यांना दूर करून लोकांच्या हितसंबंधी लक्ष देऊन रस्त्याचे काम पूर्ण करण्यात यावे अशी मागणी वरवट बकाल वाहन चालक व व्यापारी वर्गाकडून होत आहे.

बॉक्स 

*वरवट बकाल बावनंबिर ते टूनकी रस्त्याचे बांधकाम चालू असून हे बांधकाम कोणत्या योजनेतून किंवा कोणत्या निधी मधून करण्यात येत आहे अशा प्रकारची सूचना फलक?...*

Post a Comment

0 Comments