Advertisement

मातोश्री नाथियाबाई विद्यालयात 'अभ्यासातील शिस्त आणि गुणवत्ता' विषयावर मार्गदर्शन सत्र

मातोश्री नाथियाबाई विद्यालयात 'अभ्यासातील शिस्त आणि गुणवत्ता' विषयावर मार्गदर्शन सत्र
प्रतिनिधी जळगाव जामोद
सुनगाव येथील मातोश्री नाथियाबाई विद्यालय आणि इंग्लिश मिडीयम स्कूल येथे 'करिअर अँड रूरल टॅलेंट डेव्हलोपमेंट सेंटर' अंतर्गत 'अभ्यासातील शिस्त आणि गुणवत्ता' या विषयावर माजी गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख श्री. मधुकर ढोले यांचे मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले. श्री. ढोले यांनी शालेय जीवनात शिस्तीचे महत्व, शिक्षणाचा अर्थ आणि हेतू, आरोग्य, आकलन, जीवन कौशल्य, सामाजिक कर्तव्य, गुणवत्तापूर्ण अभ्यास याविषयी व्याख्यान दिले. श्री. ढोले यांनी गुणवत्तेचे समीकरण मांडत क्षमता आणि प्रभुत्व का आवश्यक आहे याची चर्चा केली. प्रश्नोत्तराच्या माध्यमाने विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला. मार्गदर्शन सत्रासाठी अनेक पालकांनीही उपस्थिती लावली होती. शाळेचे मुख्याध्यापक श्री. संजय इंगळे यांनी अध्यक्षीय भाषण केले. श्री. एकनाथ अढाव, कु. ज्योती खवले आणि कु. मनीषा बाणाईत यांनी समन्वय म्हणून जबाबदारी पार पाडली. सुनगाव सारख्या अती ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच करिअर मार्गदर्शन मिळावे यासाठी या मातोश्री नाथियाबाई विद्यालयाचे अध्यक्ष प्रा. डॉ. कुलदीपसिंह दर्यावसिंह राजपूत यांनी 'करिअर अँड रुरल टॅलेंट डेव्हलपमेंट सेंटर' ची सुरुवात शाळेमध्ये केली आहे.

Post a Comment

0 Comments