Advertisement

विदर्भात शेतकरी बांधव यांच्या वतीने, नामदार,मुख्यमंत्री एकनाथ रावजी शिंदे साहेब यांचा मनपूर्वक आभार

विदर्भात शेतकरी बांधव यांच्या वतीने, नामदार,मुख्यमंत्री एकनाथ रावजी शिंदे साहेब यांचा मनपूर्वक आभार 
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी 
बुलढाणा, आमदार बुलढाणा मा, श्री संजयभाऊ गायकवाड,
महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी अतिशय सकारात्मक आणि शेतकऱ्यांना दिलासा देणारा असा निर्णय विदर्भातील सर्वात महत्त्वाचे पीक सोयाबीनला पर हेक्टर २७ हजार म्हणजे तीन हेक्टराला ८१ हजार तर कापसाला पर हेक्टर २७ हजार, तीन हेक्टरी ८१ हजार अशी मदत त्या ठिकाणी जाहीर केली. 

 त्याबद्दल शेतकरी हिताचा मुद्दा माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे वेळोवेळी लावून धरला होता, त्याबद्दल बुलढाणा विधानसभा मतदार संघातील समस्त शेतकरी बांधवां तर्फे मा, बुलढाणा आमदार संजयभाऊ गायकवाड यांचा शिवसेना मातोश्री जनसंपर्क कार्यालय येथे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले तसेच सन्माननीय मुख्यमंत्री नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. 

यावेळी त्या ठिकाणी समस्त विधानसभा मतदारसंघातील शिवसेना युवा सेनेचे पदाधिकारी तसेच शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते....!


Post a Comment

0 Comments