Advertisement

भोपळे विद्यालयात संत गाडगेबाबा पुण्यतिथीचे आयोजन बाळासाहेब नेरकर कडुन

भोपळे विद्यालयात संत गाडगेबाबा पुण्यतिथीचे आयोजन 
बाळासाहेब नेरकर कडुन
हिवरखेड येथील सहदेवराव भोपळे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात महात्मा जोतीराव फुले यांच्या स्मृतीदिनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिलकुमार भोपळे, प्रमुख उपस्थितीत सहकार्यवाह स्नेहल भोपळे, प्राचार्य संतोषकुमार राऊत, नवनियुक्त पर्यवेक्षक गणेश खानझोडे हे होते. यावेळी उपस्थितांनी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला हारार्पण करून अभिवादन केले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष अनिलकुमार भोपळे यांनी संत गाडगेबाबा यांनी सांगितलेली दशसूत्री समाजात अंगिकारली पाहिजे असे सांगून विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्व सांगितले. यावेळी निलेश गिऱ्हे, मयूर लहाने, स्वप्नील गिऱ्हे, अमोल दामधर, निलेश कासोटे, दुर्गा बोपले, आरती इंगळे, निलेश दांडगे आदी शिक्षक- शिक्षिका व कर्मचारी वृंद यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे संचालन निखील भड यांनी केले.

Post a Comment

0 Comments