Advertisement

बाळकृष्ण ऊपाख्य बाळासाहेब नेरकर यांना दिव्यांग ऊर्जा पुरस्कार घोषित

बाळकृष्ण ऊपाख्य बाळासाहेब नेरकर यांना दिव्यांग ऊर्जा पुरस्कार घोषित
हिवरखेड येथील ज्येष्ठ पत्रकार , भाजपा दिव्यांग सेलचे जिल्हाध्यक्ष संत गाडगेबाबा सेवा समीती हिवरखेड चे सस्थांपक पदाधिकारी , प्रेस क्लबचे हिवरखेडचे ज्येष्ठ सदस्य बाळासाहेब नेरकर यांना यावर्षीचा अतिशय प्रतिष्ठित समजला जाणारा राज्यस्तरीय दिव्यांग ऊर्जा हा पुरस्कार घोषित करण्यात आलाश्री आहे
          शिवूर्जा प्रतिष्ठान संस्था यांच्या वतीने आयोजित सर्वोच्च कळसुबाई शिखर पायथा मंदिर माची तालुका अकोले जिल्हा अहमदनगर येथे दिनांक 1 जानेवारी 2024 रोजी बाळकृष्ण नेरकर यांना दिव्यांग ऊर्जा हा पुरस्कार देण्यात येईल.
बाळकृष्ण नेरकर यांनी सदरहू वर्षात दिव्यांग क्षेत्रात अतुलनीय, प्रेरणादायी, आणि ऊर्जादायक कार्य केल्याबद्दल हा पुरस्कार नेरकर यांना देण्यात येत असल्याचे पत्राद्वारे कळविण्यात आले आहे. बाळकृष्ण नेरकर यांच्या नियुक्तीमुळे त्यांच्यावर संपूर्ण हिवरखेड शहरात तसेच परिसरात अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

0 Comments