Advertisement

मौजे सोनाळा येथील ग्रामपंचायत व प्रशासनाच्या अनुदानातुन झालेल्या कामांची सखोल चौकशी करून दोषींवर कार्यवाही करण्यात यावी याकरिता संग्रामपूर गटविकास अधिकारी यांना दिले निवेदन

सोनाळा येथील ग्रामपंचायत व प्रशासनाच्या अनुदानातुन झालेल्या कामांची सखोल चौकशी करून दोषींवर कार्यवाही करण्यात यावी याकरिता संग्रामपूर  गटविकास अधिकारी यांना दिले निवेदन
प्रतिनिधी संग्रामपूर 
मौजे सोनाळा येथील ग्रामपंचायत व प्रशासनाच्या अनुदानातुन झालेल्या कामांची सखोल चौकशी करून दोषींवर कार्यवाही करण्यात यावी याकरिता.मनसेच्या वतीने संग्रामपूर येथे गटविकास अधिकारी यांना दिले निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे  मौजे सोनाळा गावात झालेल्या ग्रामपंचायत व प्रशासनाच्या अनुदानातुन सन २०२० मार्च २०२३ पर्यंत झालेल्या विकास व बांधकाम केलेल्या इतर कामांची संपुर्ण चौकशी व तपासणी करून कार्यवाही ची प्रत देण्यात यावी. तसेच १५ वा वित आयोग ग्राम स्वच्छता अभियान पंचायत समिती जि.प व ग्रामपंचायत स्तरावरील झालेले कामे तसेच वरील कामाचे प्रशासन अनुदान व झालेला खर्च कुठे व कोणत्या ठिकाणी झाला व ग्रामपंचायत बॅक पासबुक च्या खातेनिहाय संपूर्ण माहिती द्यावी. सदर चौकशी व तपासणी विनविलंब तात्काळ सर्व तपासणी करून दोषीवर तात्काळ कार्यवाही करण्यात यावी. अन्यथा दि.. रोजी संग्रामपुर पंचायत समिती कार्यालय समोर आम्ही अन्यत्याग करून आमरण उपोषण करणार आहोत. असे निवेदन मध्ये  मनसेचे तालुका उपाध्यक्ष पवन शिंडे ,पवन ज्ञानेश्वर नरहरी कुकडे मनसे शहर अध्यक्ष  अशोक सुके,पारीह अली,आकाश उत्तम वानखाडे ,ज्ञानेश्वर नरहरी कुकडे मनसे शहर अध्यक्ष सोनाळा यांच्या सह्या 

Post a Comment

0 Comments