शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला रुग्णांच्या जेवणात अळ्या व कीडे निघाल्याने मनसे स्टाईल मध्ये तिर्व्र आंदोलनाचा इशारा
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला रुग्णांच्या जेवणात अळ्या व कीडे निघाल्याने मनसे स्टाईल मध्ये तिर्व्र आंदोलनाचा इशाराअकोला , दिनांक 29/12/2023 रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या वतीने निवेदन सादर ,शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला रुग्णालयात रूग्णांच्या जेवणात अळ्या व किडे निघाले त्याची चौकशी करून रुग्णांना स्वच्छ व सकस आहार देण्यात यावे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला या दवाखान्यात रुग्ण उकर्जा बळीराम मेहरे, रा. उगवा हे वार्ड क्र 31 मध्ये उपचारार्थ भरती आहे. दिनांक 29/12/2023 रोजी दुपारी 12 वाजता जेवन घ्यायला गेले असता सदर आहार मध्ये अड्या व किडे दिसून आले त्या जेवनाचा
छायाचित्र आपल्या कडे उपलब्ध आहे. सदर रुग्णाने आहार विषयी तक्रार केली असता तेथील कर्मचा-यांनी ते जेवन फेकून दिले व रूग्णास दमदाटी करून हाकलून दिले. त्यानंतर त्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जिल्हाध्यक्षा कडे तक्रार करून सदर घटनेची माहिती दिली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आपणास या गंभीर प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून हलगर्जी पणा करणारे कर्मचा-यावर निलंबना ची कार्यवाही करावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तिव्र आंदोलन या विषयावर म,न,से स्टाईल मध्ये छेडण्यात येईल. आपण या प्रकरणाची गार्भीयाने दखल घ्यावी. शासकीय वैद्यकीय रूग्णालय अकोला येथे रूग्ण जेवण्याची व्यवस्था श्री,संत गजानन महाराज संस्थान शेगांव यांच्या कडे देण्यात यावे. करीता अर्ज माहितीस्तव सविनय सादर.
0 Comments