शेगाव तालुका प्रतिनिधी
बुलढाणा,आज दिनांक १७ डिसेंबर २०२३ रोजी बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील ग्रामपंचायत सुंदर खेड शिवारा मध्ये भव्य बुद्ध विहार देण्यात येत आहे त्या कामांचा भूमिपूजन सोहळा आज रोजी शिवसेना आमदार बुलढाणा मा, श्री संजयभाऊ गायकवाड यांच्या हस्ते संपन्न
या कामांमध्ये प्रामुख्याने खालील ठिकाणांचा समावेश आहे
१) मौजे सुंदरखेड शांतीनगर येथे बुद्ध विहार बांधकामाचा मूलभूषण सोहळा रुपये १२ लक्ष...!
२) मौजे सुंदरखेड येथे सेंट जोसेफ शाळेत जवळ बुद्ध विहार बांधकामांचा भूमिपूजन सोहळा रुपये १२ लक्ष...!
३) मौजे सुंदरखेड येथील चेतना नगर येथे बुद्ध विहार बांधकामाचा भूमिपूजन सोहळा रुपये १२ लक्ष...!
४) मौजे सुंदरखेड जुनागाव येथील अंगणवाडी जवळ बुद्धविहार बांधकामाचा भूमिपूजन सोहळा रुपये १२ लक्ष...!
५) मौजे सुंदरखेड येथील काँग्रेस नगर येथे बौद्ध विहार बांधकामाचा बहुजन सोहळा रुपये १२ लक्ष...!
६) मौजे सुंदरखेड येथील चांडक लेआउट परिसरातील बोधिसत्व नगर येथे बुद्ध विहार बांधकामाचा भूमिपूजन सोहळा १२ लक्ष...!
७)मौजे सुंदरखेड जेतवन मध्ये बुद्ध विहार बांधकामाचा भूमिपूजन सोहळा रुपये १२ लक्ष....!
यावेळी त्या ठिकाणी सोबत युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड, शिवसेना जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत, किसन सेना तालुकाप्रमुख संदीप गायकवाड, तालुकाप्रमुख धनंजय बारोटे, महिला आघाडी तालुकाप्रमुख वर्षाताई तायडे, युवासेना तालुका प्रमुख श्रीकांत जाधव, शिवदूत तालुका समन्वयक नितीन राजपूत, वाहतूक सेना तालुकाप्रमुख कुलदीप गावंडे, सुंदरखेड सरपंच अपर्णाताई राजेश चव्हाण, माजी सरपंच श्री अरुण सिरसाठ, उपसरपंच श्री. निलेश राठोड, ग्रामपंचायत सदस्य मंगलसिंग राजपूत, कल्पनाताई खरे,विजय इल्लरकर, कमलताई गवई, शुभम पऱ्हाड, तुषार खरे, संगीताताई चंदन, स्वातीताई गुलगुले,कमलेश चंदन, पुनमताई राजपूत, विलास खरे, कांचनताई सोनपसारे, शिवाजी हिवाळे, सारिकाताई दाभाडे, स्वातीताई तळेकर, शुभांगीताई रिंढे, यांच्यासह सुंदरखेड परिसरातील असंख्य नागरिक तसेच शिवसेना युवा सेनेचे पदाधिकारी तथा कार्यकर्ते उपस्थित होते....!
0 Comments