Advertisement

अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याची आईची तक्रार.. पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल..

अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याची आईची तक्रार..
 पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल..
 प्रतिनिधी जळगाव जामोद स्थानिक शहरा नजीक असलेल्या वाडी बू भागातील पंधरा वर्षीयअल्पवयीन मुलीला मेहकर तालुक्यातील शेंदला येथील आरोपी सोनु भवरलाल पवार याने 5 डिसेंबर रोजी पळवून नेले असल्याची तक्रार काल 8 डिसेंबर रोजी अल्पवयीन मुलीच्या आईने दिली आहे.... जळगांव जामोद पोलीस स्टेशनला मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार तीला चार अपत्य असून मोठा मुलगा व दोन मुली आहेत.... त्यापैकी सर्वात लहान असलेली तिचे वय पंधरा वर्षे चार महिने चार दिवस असून त्यापैकी क्रमांक तीन ची मुलगी इयत्ता सहावी पर्यंत शिकलेली आहे... 
 सध्या ती घरकाम करते परंतु घटनेच्या दिवशी दुपारी एक वाजता भाजीपाला आणण्या करिता घरून निघून गेली परंतु बराच वेळ परत न आल्याने आम्ही तिचा शोध घेतला ते कुठेच मिळून आली नाही त्यानंतर रात्री उशिरा पळून नेलेल्या मुलीचा बहिणीच्या मोबाईलवर कॉल आला व मला सोनू भवरलाल पवार राहणार शेंदला तालुका मेहकर याने येथे आणले आहे... 
सदर अल्पवयीन मुलीस फुस l लावून पळवून नेले असल्याची तक्रार अल्पवयीन मुलीची आई हिने दिली असून पोलिसांनी भारतीय दंड संहिता 1860 चे 363 कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस स्टेशनचे ठाणेदार दिनेश झांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Post a Comment

0 Comments