जळगाव जा :- पूर्णा नदीचा पुल ओलांडून मानेगाव कडे येत असतांना इंदोरे यांच्या वीटभट्टजवळ ट्रॅक्टर वरून खाली पडून आठ वर्षीय करणं सुभाष चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला तर त्याची आई सोनी सुभाष चव्हाण यांना गंभिर अवस्थेत उपचारासाठी नेत असतानाच तीचाही मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना २० डिसेंबर रोजी मानेगाव जवळ सायंकाळी घडली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार करणं व त्याची आई दोघेही बांडा पिपल येथील रहिवासी असून वीटभट्टयावर काम काम करण्यासाठी हे कुटुंब आले होते.अपघत झाला त्यावेळी दोघेही मालयेक ट्रॅक्टर वर बसलेले होते.माणेगाव जवळ असलेल्या एका वळणावर इंदोरे यांच्या वीटभट्टजवळ ट्रॅक्टर चालकाचा ताबा सुटल्याने दोघेही मायलेक ट्रॅक्टर खाली पडले व त्यातच दोघांनाही आपल्या प्राणास मुकावे लागले.अपघातस्थळी हजर असलेल्या लोकांनी ट्रॅक्टरचा ड्रायव्हर मध्ये धुंद अवस्थेत असून पुस्तकाचा नातेवाईक असल्याचे सांगितले.कदाचीत ट्रॅक्टरचा ड्रायव्हर दारू पिलेला नसता तर असला अनुचित प्रकार घडला नसता.त्यामुळे परिसरात अवैधपणे दारु विक्री करण्याऱ्या वर कार्यवाही करूण परिसरातील दारू विक्री बंद करण्यात यावी अशी मागणी सुद्धा परिसरातील लोक करत आहे.
जळगाव जामोद तालुका हा आदिवासी बहुल तालुका असून शेती व शेतमजूर यावरच त्यांचा कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो.झाडेगाव-माणेगाव विटभट्यासाठी जिल्ह्यात प्रसिद्ध असून,या विटभट्यावर अनेक आदिवासी कुटुंब आजरोजी काम करण्यासाठी आहेत. सुभाष चव्हाण यांनी सुद्धा येथीलच विटभट्यावर आपला संसार थाटला होता.पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते.सुभाषची पत्नी सोनी आणि करणं यांचेवर ट्रॅक्टरच्या त्या दुर्दैवी घटनेत काळाने घाला घालला आणि त्यामध्ये दोघेही मायलेकांचा करून अंत झाला.
दोघे मायलेकांच्या झालेल्या मृत्यू ने परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात असून समाजमन सुन्न झाले आहे.
0 Comments