Advertisement

शेगावात ठाणेदार सुनील अंबुलकर यांच्या संकल्पनेतून महापुरुषांच्या स्मारकांची साफसफाई करून मनसे कार्यकर्त्यांचा वाढदिवस साजरा

शेगावात ठाणेदार सुनील अंबुलकर यांच्या संकल्पनेतून महापुरुषांच्या स्मारकांची साफसफाई करून मनसे कार्यकर्त्यांचा वाढदिवस साजरा
प्रतिनिधी शेगाव-अलीकडच्या काळात तरुण पिढीत वाढदिवस साजरा करण्याचे नवे फॅड निर्माण झाले असून मोठ्या धुमधडाक्यात काहींचे वाढदिवस साजरे केले जातात. फटाके फोडणे, केक कापून आरडाओरड करणे, दारूच्या पाट्ां करणे, असा धांगडधिंगा करत अनेक तरुण आपला वाढदिवस साजरा करत असतात. समाजात फोफावत चाललेल्या या कुप्रवृतीला तिलांजली देत शेगावात मनसेने ठाणेदार सुनील अंबुलकर यांच्या संकल्पनेतून महापुरुषांच्या स्मारकांची साफसफाई करून मनसे कार्यकर्त्यांचा वाढदिवस साजरा करण्याचा परिवर्तनीय व प्रेरणादायी उपक्रम सुरू केला आहे. काल मनसे कार्यकर्ते अनंता

शेगावात मनसेचा प्रेरणादायी उपक्रम महापुरुषांच्या स्मारकांची साफसफाई करून साजरा केला जाणार कार्यकर्त्यांचा वाढदिवस
ठाणेदार सुनील अंबुलकर यांची अभिनव संकल्पना

खामगावात सामाजिक संघटनांनी प्रेरणा घ्यावी

शेगावात सुरू झालेला हा उपक्रम अतिशय प्रेरणदायी आहे. महापुरुषांना वंदन करून व त्यांच्या स्मरकांची सफाई करून साजरा होणारा वाढदिवस सामाजिक व राष्ट्रीय दायित्व पार पडल्याचा आंतरिक आनंद देऊ शकतो. त्यामुळे खामगाव शहरात सामाजिक संघटनांनी या अभिनव उपक्रमाची प्रेरणा घेणे आवश्यक आहे. खामगाव शहरात महापुरुषांची अनेक स्मारके असून असा उपक्रम जर युवकांनी हाती घेतला तर शहरातील सर्व स्मारकांची नियमित साफ सफाई होऊ शकते. स्वच्छतेबरोबरच महापुरुषांबद्दल आदरभाव व्यक्त करणारा हा उपक्रम खरोखर प्रेरणादायी म्हणावा लागेल!

नेरकर व ऋषिकेश दही बांच्या वाढदिवसानिमित्त स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी स्मारक परिसराची स्वच्छता करत स्मारकाची संपूर्ण साफसफाई मनसे सैनिक पदाधिकारी यांनी पॉझिटिव्ह केली. शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अंबुलकर यांनी दिलेल्या संकल्पनेला मनसेने प्रत्यक्षात आणत यापुढे संतनगरीमध्ये, युवकांचा वाढदिवस हा शहरातील स्मारकांची स्वच्छता करून साजरा करण्याचा संकल्प सुध्दा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या न्यूज बतीने करण्यात आला आहे. येणाऱ्या काळात विविध परिसरात असलेल्या महापुरुषांच्या स्मारकांचे स्वच्छता अभियान राबविण्यात यावे, असे आवाहन सुध्दा महाराष्ट्र नवनिर्माण सेना शेगांव शहर व तालुक्याच्या वतीने मनसे शहराध्यक्ष अमित देशमुख, तालुकाध्यक्ष रविंद्र उन्हाळे यांनी केले आहे. शहर व ग्रामीण भागात हा उपक्रम वाढदिवसासोबतच राष्ट्रहित जोपासत महापुरुषांना सुध्दा बंदनीय असा ठरणारा आहे.

Post a Comment

0 Comments