Advertisement

जळगांव जामोद शहरातील पूरग्रस्त व घरकुल लाभार्थी नागरिकांच्या तसेच कचरा संकलन व अंगणवाडी च्या समस्या त्वरित निकाली काढा अन्यथा

प्रतिनिधी जळगांव जामोद शहरातील पूरग्रस्त व घरकुल लाभार्थी नागरिकांच्या तसेच कचरा संकलन व अंगणवाडी च्या समस्या त्वरित निकाली काढा अन्यथा 15 डिसेंबर 2023 रोजी डफडे बजाओ आंदोलन
 जळगांव जामोद शहर काँग्रेस कमिटीचा प्रशासनास इशारा दिनांक 8 डिसेंबर 2023 रोजी जळगांव जामोद शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने मा उपविभागीय अधिकारी तथा नगर परिषद चे मा प्रशासक यांना खालील मागण्यांचे निवेदन देण्यात आले
    1)दिनांक 22 जुलै 2023 रोजी आलेल्या महापुरामुळे नागरिकांच्या संपूर्ण घरांची पडझड झाली व घरातील संपूर्ण साहित्य वाहून गेले त्यामुळे त्यांचे संपूर्ण आयुष्य उध्वस्त झाले त्याचप्रमाणे शहरातील छोटे मोठे व्यावसायिक दुकानदार यांचे दुकानातील माल वाहून गेला त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे त्याचप्रमाणे शेती व त्यातील पिके वाहून गेली या सर्व नुकसानग्रस्त नागरिकांना त्यांच्या झालेल्या नुकसानाच्या तुलनेत योग्य व पुरेशी नुकसान भरपाई देण्यात यावी.
    2)जळगाव जामोद शहरातील घरकुल लाभार्थ्यांना त्यांचे थकीत अनुदानाचे हप्ते विना विलंब देण्यात यावेत व नवीन अर्ज स्वीकारण्यात यावेत तसेच जुने व नवीन घरकुल लाभार्थ्यांना सहज व सुलभ पद्धतीने अनुदान मिळण्याकरता प्रशासनाने योग्य ती दखल घ्यावी.
    3)जळगाव जामोद शहरातील घनकचरा संकलन व व्यवस्थापनाचे काम पूर्णतः कोलमडीस आले असून शहरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे त्यामुळे नागरिकांना गंभीर आजाराला सामोरे जावे लागत आहे तरी साफसफाई ची कामे विना विलंब करण्यात यावीत.
   4)शहरातील लोकसंख्येच्या तुलनेत अंगणवाडीची संख्या कमी पडत असून शहरातील प्रत्येक प्रभागात आवश्यकतेनुसार नवीन अंगणवाड्याची पूर्तता करण्यात यावी.
    वरील सर्व मागण्या संदर्भात दिनांक 15 डिसेंबर 2023 रोजी मा उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर डफडेबाजाव आंदोलन करण्यात येईल त्यापासून होणाऱ्या परिणामास स्वतः प्रशासन जबाबदार राहील.
    याप्रसंगी अर्जुन घोलप, श्रीकृष्ण केदार एड संदीप मानकर, नासिर भाई,अजहर देशमुख, अयाज अहमद, अब्दुल जहीर, अनिल इंगळे ,सय्यद तौफिक , साहेबराव तायडे,गजानन लेडस्कर, उमेश नितवणे,करण नितवणे,शंकर म्हस्के,अमोल मानकर,शेख जुनेद, सय्यद अफरोज, प्रमोद पाटील,ऍड भालेराव,बब्बु भाई, सलाम खा व इत्यादी काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments