Advertisement

कृषिदुतांनि शेतकऱ्यांना दिली शेती संबंधित मोबाईल ॲप बद्द्ल माहिती..

कृषिदुतांनि शेतकऱ्यांना दिली शेती संबंधित मोबाईल ॲप बद्द्ल माहिती..

डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोला अंतर्गत येणारे स्वातंत्र्यवीर गणपतराव इंगले कृषि महाविद्यालय जळगाव जामोद येथील अंतिम वर्षातील विद्यार्थांनी ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत येणारे निवणा येथील शेतकऱ्यांना व तेथील नागरिकांना आधुनिक मोबाईल ॲप बद्द्ल माहिती दिली.
 विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना "अग्री ॲप बद्द्ल माहिती दिली. ज्याद्वारे शेतकरी बांधव पिकांचे रक्षण करणे, आणि पिकांशी संबंधित इतर माहिती मिळवू शकतात. या ॲप द्वारे शेतकरी बांधव कृषी तज्ज्ञांशी संपर्क साधु शकतात.
सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य योगेश गवई, रावे अधिकारी अविनाश अटोले, रावे समन्वय अधिकारी कु. विद्या कपले, कृषी शास्त्रज्ञ विषय तज्ञ दिपक सोनुने यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
सदर कार्यक्रमात आदित्य तायडे, तेजस तायडे, भूषण ठोंबरे, तुषार सुपळकार , सैय्यद रिझवान आणि यशवंत रेड्डी यांचा समावेश होता.

Post a Comment

0 Comments