Advertisement

मिराबाई मुंडे यांची नांदुरा तालुका महिला अध्यक्षपदी निवड मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे

मिराबाई मुंडे यांची नांदुरा तालुका महिला अध्यक्षपदी निवड 
मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे
नांदुरा तालुक्यातील दिव्यांग बांधवांच्या समस्या जाणून घेण्यासाठी दिनांक 28 12 2023 रोजी नांदुरा तालुक्यातील ईसर खेड गावामध्ये दिव्यांग मल्टीपर्पज फाउंडेशन चे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली दिव्यांग बांधवांच्या समस्या जाणून घेऊन बैठक संपन्न झाली. तसेच दिव्यांग मल्टीपर्पज फाउंडेशन चे मिराबाई मुंडे यांची नांदुरा तालुका महिला अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.व त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या तसेच दिव्यांग मल्टीपर्पज फाउंडेशन मलकापूर यांच्या वर्धापन दिनानिमित्त 3.1. 2024 रोजी मलकापूर चाळीस बिगा भातुल मंडळ च्या बाजूला शिक्षक हॉल येथे भव्य दिव्य आरोग्य शिबिर व नेत्र तपासणी मोफत करण्यात येईल असे सांगण्यात आले व सर्व दिव्यांग बांधवांनी व नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने लाभ घेण्यात यावा त्यावेळी दिव्यांग मल्टीपर्पज फाउंडेशनचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष नागेश सुरंगे नांदुरा तालुकाध्यक्ष प्रकाश चोपडे मिराबाई मुंडे इतर दिव्यांग बांधव उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments