प्रतिनिधी खामगाव
महासिद्ध अर्बन विश्वसनियतीचे दुसरे नाव - राणा दिलीपकुमार सानंदा मा.आमदार खामगाव मतदारसंघ.
पैशावर विश्वास नका ठेऊ तर विश्वासावर पैसे ठेवा हे आमच्या पतसंस्थेचे ब्रिद वाक्य- डॉ.सौ.स्वाती संदीप वाकेकर
सुटाळा बु (तालुका - खामगाव )जळगाव जामोद येथे मुख्यालय असलेल्या महासिध्द अर्बन च्या अकराव्या शाखेचे उद्घाटन आज दिनांक 26 डिसेंबर रोजी राणा दिलीप कुमार सानंदा (माजी आमदार खामगाव ) यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महासिद्ध अर्बन पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा सातपुडा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार कृष्णराव इंगळे हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून अशोकभाऊ सोनोने (सदस्य पार्लमेंटरी बोर्ड वंचित बहुजन आघाडी) तसेच ह.भ.प.भिकाजी महाराज हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून सुभाष पेसोडे सभापती, कृ ऊ बा खामगाव, सौ. वर्षाताई इंगळे सरपंच ग्रामंचायत सुटाळा बू, धनंजयबापू देशमुख,काँग्रेस प्रदेश सचिव, तेजेंद्रसिंग चौहान काँग्रेस प्रदेश अध्यक्ष सेवादल, धोंडीराम खंडारे अधक्ष माळी सेवा मंडळ, खामगाव, , पुंडलिकराव वानखडे माजी सरपंच, सौ. उर्मिला ताई गायकी मा सभापती पं स खामगाव, डॉ.संदीप वाकेकर, भीमरावजी राऊत, बंसीसेठ राठी, ज्ञानेश्वर दबडगाव उपसरपंच, सतीश भाऊ चौधरी, योगेश हजारे पत्रकार, डॉ.राहुल खंडारे व जयेश वावगे उपसरपंच सुटाळा खुर्द, माजी सैनिक मधुकरराव इंगळे, पंकज अग्रवाल इत्यादी उपस्थित होते.
सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी उद्घाटन पर भाषणात आपले विचार व्यक्त करताना महासिद्ध पत संस्थेने विश्वसनियता हि टिकवून ठेवली. व यशाचे शिखरे पादांकृत केले , असे यावेळी उद्घाटक म्हणून राणा दिलीप कुमार सानंदा यांनी मत व्यक्त केले.
खामगाव परिसरात भाऊंनी पतसंस्था उघडून सुटाळा बू वासीयांची अपेक्षा पूर्ण केली. लवकरच ही शाखा सुद्धा भरभराटीस येईल, व आपला नावलौकिक प्राप्त करेल असे यावेळी अशोक भाऊ सोनोने यांनी मत व्यक्त केले.
संस्थेच्या अध्यक्षा डॉ.स्वाती संदिप वाकेकर यांनी मत व्यक्त करताना संस्थेचा आजवरचा लेखाजोखा जनतेसमोर मांडला. आज जरी या संस्थेच्या 92 कोटी ठेवी असल्या तरी आपल्या सर्वांचा विश्वास प्रेम यामुळे शक्य झाले आहे. महासिद्ध च्या अकराव्या शाखेचा उद्घाटन सोहळा आपल्या सर्वांच्या साक्षीने होत आहे हे माझे अहोभाग्य.
यावेळी संस्थापक अध्यक्ष जळगाव मतदारसंघाचे मा.आमदार कृष्णराव इंगळे यांनी आपले मत व्यक्त करताना संस्था माझी एकट्याची नसून आपल्या सर्वांची आहे. आपल्या सर्वांचे भाग भांडवलदार यांचा यात सहभाग आहे व आपल्या विश्वासाला आम्ही कधी तडा जाऊ देणार नाही असे अगदी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन प्रदीप सातव यांनी केले तर आभार प्रदर्शन पांडुरंग राखोंडे यांनी केले कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी संस्थेचे सर्व कर्मचारी तथा सदाशिव चोपडे, मनोज वानखेडे, त्रंबक इंगळे, एकनाथ इंगळे, दिनेश इंगळे, संतोष बगाडे, महादेव बनकर, सागर घोगले, भारत पाटील, सदानंद खंडारे, अर्जुन भोपळे, रमेश भोपळे, विश्वनाथ सातव, नारायण पाटील, आसाराम घोगले, अनंत सातव, मंगेश भोपळे, विशाल बोचरे, ज्ञानेश्र्वर वानखेडे , सौ प्राजक्ता सातव, श्री अनिल इंगळे यांनी परिश्रम घेतले.
0 Comments