Advertisement

पिंपळगांव काळे ग्रामस्थ बसणार आमरण उपोषणाला.!

पिंपळगांव काळे ग्रामस्थ बसणार आमरण उपोषणाला.! 
प्रतिनिधी जळगाव जामोद 
पिंपळगांव काळे:- पिंपळगांव काळे गावातील संपूर्ण शेतकरी शेतमजूर तरुण, विद्यार्थी, तसेच गाई, म्हशी, बैल, सुद्धा बेमुदत आमरण उपोषन करणार आहे या संदर्भात आज उपविभागीय अधिकारी यांना उपोषणाचे लेखी पत्र देण्यात आले. सदर उपोषण हे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी करण्यात येणार असून या मध्ये 
जळगांव जामोद तालुक्यतील पिकविमा कंपनीने ५१९६ तक्रारी का नाकारल्या तसेच नाकारलेल्या तक्रारी ग्राह्य धरून पीक विमा द्या. २७ नोव्हेंम्बर २०२३ रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे व गारपिटीमुळे झालेच्या पीक नुकसानीची तात्काळ मदत द्या. 22 जुलै रोजी झालेल्या महापुरामुळे पिकांच्या नुकसानीचे कृषी विभागच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी ऑफलाईन तक्रारी विमा कंपनीकडे केल्या होत्या त्या तक्रारींचे काय झाले? ऑफलाईन केलेल्या तक्रारी ग्राह्य धारून शेतकऱ्यांना पिक विमा देण्यात यावा, 22 जुलै रोजी झालेल्या महापुरामुळे पिकांच्या नुकसानीचा विना निकष सरसकट पिकविमा देण्यात यावा. येलो मोझँक मुळे सोयाबीन पिकांच्या नुकसानीची भरीव मदत द्यावी, कापूस नुकसानीच्या पूर्वसूचना देते वेळी नजरचुकीने 'काढणी पश्चत' नुकसान हा पर्याय शेतकऱ्यांकडून  निवडल्या गेल्यामुळे विमा कंपनीने नाकारलेल्या तक्रारी ग्राह्य धरून पिकविमा देण्यात यावा पि.एम किसन सन्मान निधीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांच्या लँड सेटिंग ची व अन्य समस्या तात्काळ सोडवा. तसेच पि.एम किसान योजने संदर्भात शेतकऱ्यांना पैश्याची मागणी करणाऱ्या कर्मचाऱ्याला निलंबित करा,
महापुरामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खचलेल्या विहिरी दुरुस्त करा किंवा नवीन विहिरी प्राधान्याने मान्य करण्यात याव्या, पिंपळगांव काळे येथील पशु वैद्यकीय दवाखान्यात डॉ उपलब्ध करून द्यावे, छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना व महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेतून वंचित राहिलेल्या शेतकऱ्याचे कर्ज माफ करा. दुष्काळ जाहीर झालेल्या मंडळांना तात्काळ भरीव  आर्थिक मदत द्यावे व शेतकऱ्यांच्या कृषि पंपाना रात्री वीज पुरवठा न करता दिवसा आठ तास वीज उपलब्ध करून घ्या.या सर्व मागण्यांसाठी दि२५/०१/२०२४ रोजी ग्रामपंचायत समोर संपूर्ण गाववासी आमरण उपोषण करणार आहेत या संदर्भात उपोषणाचे लेखी पत्र उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले त्या वेळी सारथी फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष प्रकाश विठ्ठलराव भिसे, रतन नाईक, सुनील बोदडे, निलेश वानखडे, गणेश बोदडे, रमेश बैरागी, भास्कर वाघमारे, गुलाबराव आठवले, आनंद गवई, पंकज शेटे. आदी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments