बाळासाहेब नेरकर कडुन
अयोध्यातील 22 जानेवारी ला होणाऱ्या रामलीला मूर्तीचे प्रतिष्ठापना निमित्त शहरातील सर्व मंदिराची साफसफाई व इतर धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहे याच पृष्ठभूमीवर शहरातील सर्वात जुने राम मंदिर व त्या परिसरातील सर्व भागाची स्वच्छता करण्याकरिता आज सकाळी मा आमदार स्वतः भाजपांच्या कार्यकर्त्यांसह मंदिरात जाऊन सर्व परिसर धुवून स्वच्छ केलाया राम मंदिराला पुरातन वारसा लाभलेला असून जवळपास 1100 वर्षांपूर्वीचे हे मंदिर असावे असा कयास वर्तुविला जातो राम मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या वेळी तात्पुरत्या स्वरूपात मूर्ति हटविली असता त्या ठिकाणी मुघल शाही व शिवशाहीच्या वेळेचे काही अवशेष आढळले यावरून सदर मंदिर जवळपास 1100 वर्षांपूर्वीचे असावे असा अंदाज लावला जातो 1806 मध्ये मंदिरासमोर राहणारे बन्सीलालजी दुबे यांनी या मंदिराची दुरुस्ती केली त्यानंतर त्यांचे चिरंजीव त्र्यंबक लाल जी दुबे व नंतर मधुकरराव दुबे यांनी या मंदिराची देखभाल केलेली आहे मधुकरराव दुबे यांची चिरंजीव कै शरद चंद्र दुबे यांनी ही परंपरा चालू ठेवली होती परंतु मंदिराच्या जिर्णोद्धाराकडे कोणाचेही लक्ष नव्हते स्वर्गीय मधुकरराव दुबे यांच्या धर्मपत्नी स्वर्गीय मंदाकिनी मधुकर दुबे यांना एक साक्षात्कार झाला त्यानुसार त्यांचे जबलपूरचे जावई राजेश्वर दुबे यांनी अकरा लाख रुपये खर्च करून सदर मंदिराचा कायापालट केला आज दिनांक 18 जानेवारीला सकाळीच आमदार हरीश पिंपळे यांच्या नेतृत्वात भाजपाच्या सर्व कार्यकर्त्यांनी मंदिराची स्वच्छता केली या धार्मिक कामाकरिता भाजपा शहर अध्यक्ष रितेश साबाजकरहर्षल साबळे अमोल प्रजापती कोमल तायडे राहुल गुल्हाने अभिमन्यू गावंडे योगेश आगाशे गोपाल दायमा नितीन भटकर अर्पण दुबे मनोज गुप्ता अभय दुबे शिवम पिंपळे विशाल गुप्ता श्रीनिवास दीक्षित प्रवीण लोहपुरे आनंद गुप्ता दीपक हुंडाणे गजू गोळंबे राम कांबे प्रथम मोहोळ आधी कार्यकर्ते उपस्थित होते
0 Comments