भाजपा कडून शाल श्रीफळ देऊन सुंदरकांड मंडळाचे अभीनंदनपर शूभेच्छा
बाळासाहेब नेरकर कडून
अकोला राम भक्ती श्रद्धा आणि विश्वासासोबत राज राजेश्वर नगरीचे नाव उज्वल करणाऱ्या राज राजेश्वर सुंदरकांड मंडळ हे अयोध्या धाम येथे जाऊन अखंड रामायण भजन कीर्तन नामस्मरण सुंदर कांड ,हनु मान चालीसा पठाण संगीतमय करून प्रभू रामचंद्राचा मंदिर प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमात अकोले करांचे प्रतिनिधित्व करत असून वादक पासून तर वेदपाठी ब्राह्मण, भजन कीर्तनकार हे अकोल्याचे नाव अयोध्येत प्रसिद्ध करत असून हे अकोलेकराचे सौभाग्य असल्याचे व त्यांना नमन करण्याचा कार्यक्रम भारतीय जनता पक्षाने करून अकोले करांच्या वतीने प्रभू रामचंद्राच्या चरणी प्रार्थना पाठवल्याचे प्रतिपादन आमदार रणधीर सावरकर यांनी केले
अकोल्यातील राजराजेश्वर सुंदरकांड मंडळ सीता महल अयोध्या धाम इथे महामंडलेश्वर महंत श्याम बिहारी दास महाराज यांच्या वतीने त्यांना आमंत्रित करण्यात आले आहे 19 जानेवारी रोजी सकाळी सात वाजता अखंड रामायण सुरू करणार आहेत, तर 21 तारखेला सकाळी नऊ वाजता पासून तर सुंदर कांड , तसेच आरती महाप्रसाद 23 तारखेला महाआरती दर्शन कार्यक्रम करणार आहे, भारतीय जनता पार्टी व श्री जानकी वल्लभ सरकार धर्मार्थ संस्थेच्या वतीने अरुण भाऊ जीरापुरे तर प्रेरणा प्रतिष्ठानच्या वतीने शामसुंदर शर्मा राजूभाऊ ठाकूर,ईत्यादीच्यावतीने बालयोगी गोपी गोपालनाथ, बाबा रतनगड यांचं स्वागत तसेच मातृशक्ती यांचे स्वागत अकोला महानगर भाजपा अध्यक्ष जयंत मसने यांच्या हस्ते भाजपा कार्यालयात करण्यात आले. यावेळी शंतनु माई आनंदकंद महाराज, विक्रम शर्मा, श्रीकांत गदाधर शास्त्री, सह जाणारे सर्व भक्त हे अकोल्यासाठी प्रेरणादायी असल्याचे सांगून अकोल्याची मान उंचावल्या बद्दल या सर्वांचे अभिनंदन केले सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक गीरीश जोशी यांनी संचालन संजय गोटफोडे यांनी तर आभार संजय जिरापुरे यांनी केले
0 Comments