Advertisement

पो.स्टे.जळगाव जा.हद्दीत २७ हजार रुपयाचा गुटखा पकडला आरोपी अटकेत...

 पो.स्टे.जळगाव जा.हद्दीत २७ हजार रुपयाचा गुटखा पकडला आरोपी अटकेत...
जळगांव जा. प्रतिनिधी 
जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीतील खांडवी पिंपळगाव काळे रोडवरील मरी माता मंदिराजवळ स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका व्यक्तीस मोटरसायकलवर महाराष्ट्रामध्ये बंदी असलेल्या मानवी आरोग्यास हानिकारक गुटखा आज दिनांक 21 जानेवारी 24 रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांचा जळगाव पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी पकडला. सविस्तर असे की स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली की पिंपळगाव काळे ते खांडवी या मार्गे मोटर सायकल वर एक तरुण महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला मानवी आरोग्यास अपायकारक गुटखा आणत आहे त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पिंपळगाव खांडवी रोडवरील मरीमाता मंदिराजवळ आरोपीची मोटरसायकल थांबवुन झडती घेतली असता आरोपी तरूणाजवळुन 1500 रुपये किमतीचे इनसाईड किंग तंबाखू पाकिटे, 2500 रुपये किमतीचा विमल पान मसाला बिग पॅक पाकिटे, 17 हजार रुपये किमतीची केसरी युक्त विमल पान मसाला 85 पाकिटे छोटी,1700 रुपये किमतीची व्हि वन तंबाखू 15 पाकिटे, 3000 रुपये किमतीची केसर युक्त विमल पान मसाला 15 पाकिटे मोठी,1000 रुपये किमतीची वाह पानमसाला 5 पाकिटे,200 रुपये वाह कंपनीचा पान मसाला तंबाखू असा एकूण 27 हजार दोनशे रुपयांचा गुटखा व एक मोटर सायकल 90000 किमतीची एक मोबाईल ओपो कंपनीचा किंमत दहा हजार रुपये असा एकूण एक लाख 27 हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल आरोपी ऋषिकेश दिलीप गांधी वय 21 वर्ष राहणार पिंपळगाव काळे यांच्या ताब्यातून जप्त करून आरोपीस अटक करण्यात आली असुन आरोपी ऋषिकेश गांधी यांच्या विरोधात अप क्र. 41/2024 कलम 328,188,272,273 भादवि सह अन् सुरक्षा मानके कायदा 2006 कलम 26(2)(1), 26(2)(iv), 27(3)(d)(e), 59 
सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी व स्थानिक जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे पोलीस हेडकॉन्स्टेबल उमेश शेगोकार, सचिन राजपूत, स्वप्निल मस्के,संदिप रिंढे यांनी केली. पुढील तपास ठाणेदार आनंद महाजन यांच्या मार्गदर्शनात पीएसआय अमोल पंडित करीत आहेत.

Post a Comment

0 Comments