प्रतिनिधी जळगाव जामोद
धनवटे नॅशनल कॉलेज नागपूर येथे दिनांक 14जानेवारी ते 19जानेवारी 2024 दरम्यान संपन्न झालेल्या विदर्भस्तरीयबॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेमध्ये जळगांव जामोद बॅडमिंटन क्लाबची खेळाडू कु. शरयू रामदास रेवस्कार हिने तीची साथीदार कु. सारा मोहित पेशकर सोबत जिद्दीने 15 वर्षे मुलींच्या वयोगटात सुवर्ण पदक पटकाविले. शरयूने नागपूरला झालेल्या बॅडमिंटन स्पर्धेमध्ये बुलढाणा जिल्याचे प्रतिनिधित्व करून आज बुलढाणा बॅडमिंटन असोसिएशनच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. शरयूने आपल्या यशाचे श्रेय प्रशिक्षक श्री. कुणाल दासरवार सर KDBA नागपूर,श्री. अजिंक्यदादा टापरे सर JBC जळगांव जामोद, श्री. आशिष दामोदर सर ADBA पुणे, सौ.कुलकर्णी मॅडम मुख्याधपिका केशव माधव विद्या मंदिर जळगांव जामोद यांना दिले आहे.तिचे सर्वत्र कौतुक होत असून बुलढाणा बॅडमिंटन असोशिएशनचे सचिव श्री.विजय पळसकर सर यांनी तिला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
0 Comments