बाळासाहेब नेरकर कडुन
हिवरखेड येथील शिक्षण क्षेत्रामध्ये अग्रगण्य असणारी शैक्षणिक संस्था सेंट पॉल अकॅडमी हिवरखेड येथे वार्षिक क्रीडा सप्ताह दिनांक 13 जानेवारी 2024 ते 19 जानेवारी 2024 पर्यंत आयोजित करण्यात आलेला होता . विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगती बरोबरच त्यांना क्रीडा क्षेत्रात सुद्धा आपले शारीरिक कौशल्य दाखवण्यासाठी या क्रीडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. शेवटच्या दिवशी बक्षीस वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक नवनीत लखोटिया सर होते तर प्रमुख उपस्थितांमध्ये प्रसिद्ध राम कथा वाचक पंडित श्री. त्रिलोकीनाथ शास्त्री मथुरा हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित होते तसेच हिवरखेड येथील जेष्ठ शिक्षक महेंद्र कराळे सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. सर्वप्रथम मेजर ध्यानचंद आणि सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचे अध्यक्ष नवनीत लखोटीया याच्या हस्ते क्रीडा मशाल प्रज्वलित करण्यात आली विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष व इतर मान्यवरांना ध्वजवंदना दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विमल येऊल यांनी केले त्यानंतर नर्सरी ते केजी टू या विद्यार्थ्यांचा द किंडर गार्टन शो आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमांमध्ये मुलांनी अप्रतिम असे नृत्य सादर करून देशातील सर्व क्रीडा प्रकारांमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना आपल्या कलेच्या माध्यमातून भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी खेळामध्ये सर्वोत्तम कामगिरी केली अशा विद्यार्थ्यांना गोल्ड आणि सिल्वर मेडल देऊन त्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला तसेच या कार्यक्रमाला हिवरखेड येथील सर्व पत्रकार बांधवांचाही संस्थेचे अध्यक्ष यांच्यावतीने सत्कार सोहळा आयोजित करण्यात आलेला होता. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले कराळे सर यांनी शाळचे कौतुक करताना शाळा नेहमीच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देत असल्याचं आपल्या भाषणामध्ये नमूद केला तसेच शाळेची उत्तरोत्तर होत असलेली प्रगती हे हिवरखेड मधील इतर शाळांच्या बरोबरीने आज शाळा आलेली आहे कारण अत्यंत कमी अल्पावधीत शाळेने संपूर्ण तालुक्यामध्ये आपलं नाव निर्माण केलेला आहे कार्यक्रमाचे अध्यक्ष नवनीत लखोटीया यांनी विद्यार्थ्यांना त्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल शुभेच्छा दिल्या व या खेळामध्ये पदक न मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना खेळामध्ये जिद्द, मेहनत आणि चिकाटी याच बळावर आपण विजय प्राप्त करू शकतो हा गुरु मंत्र दिला या स्पर्धांमध्ये पंच म्हणून आकोट शाखेचे श्री प्रशांत ठोकळ सर आणि जगदीश वडाळकर सर यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. हा संपूर्ण क्रीडा सप्ताह त्यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत तिवारी सर आणि उपमुख्याध्यापिका निमिता गांधी यांच्या समवेत कार्यक्रमाच्या यशस्वी ते करता रवींद्र वसे,विमल येऊल, क्रीडा शिक्षक जगदीश वडाळकर, नितीन कोल्हे,चैतन्य खारोडे,अंकुश अमानकर,स्वप्नील कातव,अमित बाजारे, सुलभा येलुकार, पूजा बाजारे,संगीता मानके,महेश आहेरकर,अजय इंगळे ढोले, इसोकर,दांडेकर,रवी बोरसे,अनिल वसे जाजू, दही, बाजlरे,गावंडे, सलमान शेख,दिगंबर बावने,अतीक, गौरव, राकेश दांडेकर, स्वाती गावंडे, खुमकर, जायले, भरडक, पाटील, बोळे, कोरडे, सपना चोटिया, आमले, सिसोदिया, ताळे मॅडम शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी प्रचंड मेहनत केली.
0 Comments