प्रतिनिधी जळगाव जामोद
एसडीओ, तहसीलदार यांनी दाखविली हिरवी झेंडी
जळगाव जामोद- श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयामध्ये मतदार दिन हा विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम तहसीलदार शितल सोलाट यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
त्यांनी नवमतदारांनी आपला मतदानाचा हक्क निर्भयपणे बजावावा असे सांगितले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. प्रवीण डाबरे होते. संचालन संजय गाडेकर यांनी केले. यावेळी मतदार नोडल अधिकारी तथा कार्यक्रम समन्वयक प्रा. डॉ. निलेश निंबाळकर, पर्यवेक्षक प्रा.जी. एस. वानखेडे. कनिष्ठ महाविद्यालयाचे मतदार मंडळ समन्वयक प्रा. ऋषिकेश कांडलकर,प्रा गिरीश कुलकर्णी, निवडणूक विभाग प्रभारी सत्यविजय जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
शासनाच्या मतदार जागृती अभियानांतर्गत मतदार जागृती प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीला जळगावचे उपविभागीय महसूल अधिकारी शैलेश काळे यांनी हिरवी झेंडी दाखविली.
मतदार जागृती प्रभात फेरी समापनप्रसंगी नव -मतदारांना निर्भय व निष्पक्ष मतदान करण्याबाबत शपथ देण्यात आली. शपथ पत्राचे वाचन प्रा.डॉ. निलेश निंबाळकर यांनी केले. याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.
यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी विद्यार्थिनी सहभागी झाले होते. आयोजन राज्यशास्त्र विभाग व मतदार साक्षरता मंडळ यांच्या वतीने करण्यात आले होते.
(फोटो -रॅलीला हिरवी झेंडी दाखविताना उपविभागीय महसूल अधिकारी शैलेश काळे व तहसीलदार सोलाट)
0 Comments