प्रतिनिधी जळगाव जामोद : जळगाव जामोद मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माननीय श्री डॉ. संजयजी कुटे यांचे प्रयत्नाने संपूर्ण जळगाव जामोद मतदारसंघाकरिता नमो चषक बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन स्थानिक स्व. दादासाहेब टापरे सहकारी सूतगिरणीचे बॅडमिंटन क्लब वर दि.24/01/2024 ला करण्यात आले होते. सदर स्पर्धेकरिता संपूर्ण जळगाव जामोद मतदान संघातून एकूण 183 मुले व मुलींनी सहभाग नोंदविला. सदर स्पर्धेचे उद्घाटन सौ.अपर्णाताई कुटे,श्रीमती स्नेहाताई टापरे व सौ चंदाताई पुंडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. सदर स्पर्धेत मा.आ.संजय भाऊ कुटे यांनी प्रत्यक्ष खेळाचा आनंद घेऊन विद्यार्थ्यांना खेळाचे महत्व पटवून दिले. नमो चषक स्पर्धेमध्ये मुलींच्या गटामध्ये कु.शरयू रामदास रेवस्कार हिने प्रथम क्रमांक पटकावून सुवर्णपदक तर कु.रेवा अमर पाचपोर हिने द्वितीय क्रमांक मिळवीला.मुलांच्या गटामध्ये चि.तन्मय विठ्ठल इंगळे यांने प्रथम क्रमांक तर चि.शार्विन मनोज सराफ यांने द्वितीय क्रमांक मिळविला. पुरुष दुहेरी गटात रुद्र कचरे व परीक्षित कराळे शेगाव यांनी प्रथम क्रमांक अजिंक्य टापरे व तन्मय इंगळे जळगाव जा.यांनी द्वितीय पारितोषिक प्राप्त केले.सर्व विजयी स्पर्धकांना मा.आ.संजयभाऊ कुटे यांचे कडून प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.श्री.दर्शन बावणे शेगांव प्रमोद फिरके यांनी पंच म्हणून कामगिरी पार पाडली .सदर स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी बॅडमिंटन व्यवस्थापक अजित पाटील,निलेश भाऊ शर्मा, अजिंक्य दादा टापरे,संयम छाजेड, देवेंद्र खूपसे,परीक्षित ठाकरे यांनी अथक परिश्रम घेऊन स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडल्या.
0 Comments