पिंपळगांव काळे:- शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी पिंपळगांव काळे गावकरी, शेतकरी,शेतमजूर तरुण युवक वयोवृद्ध नागरिक तसेच गुरे ढोरे यांचे आमरण उपोषण सारथी फाउंडेशन चे अध्यक्ष प्रकाश विठ्ठलराव भिसे यांच्या नेतृत्वात प्रजासत्ताक दिनाच्या आधल्या दिवशी सुरू करण्यात आले. या उपोषणात शेतकऱ्यांच्या हक्काच्या व मूलभूत मागण्या घेऊन हे उपोषण करण्यात आले आहे, या मध्ये जळगांव जामोद तालुक्यतील पिकविमा कंपनीने ५१९६ तक्रारी का नाकारल्या तसेच नाकारलेल्या तक्रारी ग्राह्य धरून पीक विमा द्या. २७ नोव्हेंम्बर २०२३ रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे व गारपिटीमुळे झालेच्या पीक नुकसानीची तात्काळ मदत द्या. 22 जुलै रोजी झालेल्या महापुरामुळे पिकांच्या नुकसानीचे कृषी विभागच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी ऑफलाईन तक्रारी विमा कंपनीकडे केल्या होत्या त्या तक्रारींचे काय झाले? ऑफलाईन केलेल्या तक्रारी ग्राह्य धारून शेतकऱ्यांना पिक विमा देण्यात यावा, 22 जुलै रोजी झालेल्या महापुरामुळे पिकांच्या नुकसानीचा विना निकष सरसकट पिकविमा देण्यात यावा. येलो मोझँक मुळे सोयाबीन पिकांच्या नुकसानीची भरीव मदत द्यावी, कापूस नुकसानीच्या पूर्वसूचना देते वेळी नजरचुकीने 'काढणी पश्चत' नुकसान हा पर्याय शेतकऱ्यांकडून निवडल्या गेल्यामुळे विमा कंपनीने नाकारलेल्या तक्रारी ग्राह्य धरून पिकविमा देण्यात यावा पि.एम किसन सन्मान निधीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांच्या लँड सेटिंग ची व अन्य समस्या तात्काळ सोडवा. तसेच पि.एम किसान योजने संदर्भात शेतकऱ्यांना पैश्याची मागणी करणाऱ्या कर्मचाऱ्याला निलंबित करा,
महापुरामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खचलेल्या विहिरी दुरुस्त करा किंवा नवीन विहिरी प्राधान्याने मान्य करण्यात याव्या, पिंपळगांव काळे येथील पशु वैद्यकीय दवाखान्यात डॉ उपलब्ध करून द्यावे, छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना व महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेतून वंचित राहिलेल्या शेतकऱ्याचे कर्ज माफ करा. दुष्काळ जाहीर झालेल्या मंडळांना तात्काळ भरीव आर्थिक मदत द्यावे व शेतकऱ्यांच्या कृषि पंपाना रात्री वीज पुरवठा न करता दिवसा आठ तास वीज उपलब्ध करून घ्या. या मागण्यांनसाठी हे उपोषण सुरू करण्यात आले आहे या उपोषणात शेकडो गावकरी, शेतकरी, शेतमजूर व गुरे ढोरे सामील झाले आहेत उपोषण मंडपात उपोषणकर्ते सारथी फाउंडेशन अध्यक्ष प्रकाश विठ्ठलराव भिसे, सामाजिक कार्यकर्ते अनिल भोपळे, रामेश्वर काळे, सुधाकर घटे, रमेश बैरागी, गजानन चोखंडे, बबलू रायने, पंकज शेट्टे, मयूर शेट्टे, सुपडा चोखंडे, सुपडा मानकर, हरिदास वाघमारे, निलेश जवरे, गोपाल भोपळे, रमेश ढोले, शुभम पाटील, फिरोज खान, प्रमोद भोपळे, दिलीप मनसुटे, जनार्दन मांडोकार, आदी गावकरी,मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.
0 Comments