तालुका जळगाव जामोद येथील पिं काळे ग्रामपंचायत येथे दिनांक २९ जानेवारी २०२४ रोजी सोमवारला परिवर्तन पॅनल वंचित बहुजन आघाडी. काँग्रेस.या पॅनलच्या उमेदवार दुर्गा उमेश मांडोकार यांची उपसरपंच पदी अविरोध निवड करण्यात आली. परिवर्तन पॅनल मध्ये वंचित बहुजन आघाडीचे तीन उमेदवार निवडून आलेले आहे.याआधी भारती महेंद्र बांगर (वंचित) ह्या उपसरपंच पदावर आरूढ होत्या त्यांचा कार्यकाळ झाल्यानंतर त्यांनी स्वईच्छेने ठरल्यानुसार राजीनामा दिला.आणि काल झालेल्या निवडणुकीत दुर्गा मांडोकार (वंचित)यांची अविरोध निवड झाली. निवड झाल्यानंतर गावामधून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी नवनिर्वाचित उपसरपंच यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांना हार अर्पण करण्यात आला.
बहुजन ह्रदयसम्राट बाळासाहेब आंबेडकर ज्या प्रमाणे वंचित घटकांना सोबत घेऊन काम करतात आणि सत्तेचा मार्ग सुकर करतात. त्याच प्रमाणे आम्ही सुध्दा गाव पातळीवर वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून वंचित घटकांना या ठिकाणी न्याय देण्याचे काम करत आहोत निवडणूक दरम्यान आम्ही जे बोललो होतो त्याप्रमाणेच उपसरपंच पद देण्याचा शब्द आम्ही पाळला. असे उपसरपंच पदाच्या छोट्या खानी बैठकीत वंचित बहुजन आघाडीचे तालुका उपाध्यक्ष श्रीकृष्ण गवई सर यांनी आपल्या मनोगत व्यक्त केले.सर्व ग्रामपंचायत सदस्यांचे अविरोध निवड केल्याबद्दल आभार व्यक्त केले. तसेच माजि जि.प.अध्यक्ष प्रकाश पाटील तथा काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष बुलढाणा यांचे सुध्दा आभार मानले.
यावेळी. माजि.जि.प.अध्यक्ष प्रकाश पाटील,संतोष गवई सर वंचित तालुका अध्यक्ष, माजि जि.प. सदस्या पुजा अवचार, सरपंच शे हारून शे युनूस अत्तार, माजि.सरपंच आशा सुनील कळस्कार. माजि.सरपंच प्रिती गोपाल तायडे.माजि उपसरपंच यशोदा घटे. माजि उपसरपंच भारती बांगर. वंदना निकम.माजि सरपंच नवलसिंग मावळे.अजय ताठे.सचिन जाधव. अशोक ढोले.विनोद बहादरे.विलास मांडोकार आदी ग्रामपंचायत सदस्य,सोसायटी अध्यक्ष श्रीकृष्ण वानखेडे.उपाध्यक्ष मयूर राऊत.सुनील कळस्कार.हरिदास वाघमारे सर्कल प्रमुख वंचित. विनोद गवई सर्कल प्रमुख वंचित.रामेश्वर बांगर.बाबुसिंग जाधव.तसेच स्थानिक गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते,
0 Comments