Advertisement

घरकुलच्या समस्यां संदर्भात वंचितचे पंचायत समितीला निवेदन

घरकुलच्या समस्यां संदर्भात वंचितचे पंचायत समितीला निवेदन
जळगाव जामोद तालुका प्रतिनिधी:-
वंचित बहुजन आघाडी जळगांव जा. च्या वतीने पंचायत समीती जळगांव जा. यांना रमाई घरकुल योजने संदर्भात निवेदन देण्यात आले. नविन उद्दीष्टवाढ , बांधकाम सुरु असलेल्या घरकुलाचे चेक , संडास बांधकामाचे चेक , तांत्रीक स्वरुपाच्या अडचणी व ग्रामपंचायत स्तरावर उर्वरीत प्रतीक्षा यादी व 'ड' यादीतील लाभार्थी यांना त्वरीत घरकुल देण्यात यावे त्याकरीता नवीन उद्दीष्ट वाढीसाठी पंचायत समिती स्तरावरुन प्रस्ताव वरीष्ठ स्तावर पाठवण्यात यावे. नवीन लाभार्थी यांचे सर्वेक्षण करुन प्रतीक्षा यादी अद्ययावत करुन घ्यावी. अशा विवीध मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडी यांचे कडुन निवेदन देण्यात आले.
 निवेदन देतांना संतोष गवई तालुकाध्यक्ष , सुगदेवराव वानखडे जेष्ठ नेते , रामकृष्ण तायडे जेष्ठ नेते , अताऊल्ला खान जि. उपा. स्वप्निल गवई जि. सदस्य , नारायण पवार जेष्ठ नेते ,प्रभात पाटील संचालक कृ.उ.बा.स , ज्ञानेश्र तायडे जेष्ठ नेते , रमेश नाईक मा. लोकनियुक्त सरपंच , तुकाराम इंगळे सरपंच , भागवत पाटील ग्रा.सदस्य , सुपेश वाघोदे ता. उपा , सुनिल भटकर ता. संघटक , जयकुमार डोंगरदीवे , अमोल तायडे , प्रा. सुभाष सिरसाट , महादेव बोदडे का.सचीव , महेंद्र जाधव , प्रितम सिरसाट ग्रा. सदस्य , अनिल सिरसाट ई. कार्यकर्ते उपस्थीत होते.

Post a Comment

0 Comments