Advertisement

इलेक्ट्रिक शॉक लागून सुनगाव येथील बांधकाम व्यावसायिक गणेश मिसाळ यांचा दुर्दैवी मृत्यू

इलेक्ट्रिक शॉक लागून सुनगाव येथील बांधकाम व्यावसायिक गणेश मिसाळ यांचा दुर्दैवी मृत्यू
जळगांव जा. प्रतिनिधी:- 
जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथील बांधकाम ठेकेदार असलेले गणेश मिसाळ वय 45 यांचा बांधकाम करत असताना इलेक्ट्रिक शॉक लागल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज दिनांक 16 जानेवारी2024 रोजी दुपारी घडली. सविस्तर असे की सुनगाव येथील बांधकाम व्यावसायिक असलेले गणेश मिसाळ हे लहान सहान घरांच्या बांधकामाचे ठेके घेऊन बांधकाम करून देत असत जळगाव जामोद शहरातील ताटीपुरा येथील श्रीकृष्ण तेलंगळे यांच्या घराचे बांधकाम करीत असताना कॉलम ची सेंट्रींग ढोकत असताना टॉमी चा ताराला स्पर्श झाल्याने मृतक गणेश मिसाळ यांना जोरदार विजेचा धक्का लागल्याने स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय जळगाव जामोद येथे नेण्यात आले होते. डॉक्टरांनी गणेश मिसाळ यांना तपासुन मृत घोषित केले. सदर घटनेचा प्राथमिक तपास जळगाव जामोद पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस उपनिरीक्षक रंजना आवारे व पोलीस शिपाई रंजीत व्यवहारे यांनी केला असून पोलिसांनी मर्ग दाखल केला असुन पुढील तपास पोलीस करीत आहेत.मृतक गणेश मिसाळ यांच्या पश्चात वडील, पत्नी,2 मुल असा बराच मोठा आप्त परिवार आहे.

Post a Comment

0 Comments