Advertisement

सातपुडा कॅम्पसमध्ये भव्य मोफत महाआरोग्य निदान शिबीर आयोजन

सातपुडा कॅम्पसमध्ये भव्य मोफत महाआरोग्य निदान शिबीर आयोजन
प्रतिनिधी जळगाव जामोद 
 वरवट बकाल- सातपुडा शिक्षण संस्था जळगाव जामोदचे अध्यक्ष मा.आ.कृष्णरावजी इंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार दि. 20 जानेवारी 2024 रोजी सातपुडा कँम्पस कला व वाणिज्य महाविद्यालय, वरवट बकाल येथे भव्य मोफत महाआरोग्य व औषधोपचार शिबिर आयोजित केले आहे. 
   या शिबिरामध्ये हृदयरोग, अस्थिरोग, नेत्ररोग, किडनीचे आजार, स्रीरोग, बालरोग, दंतरोग, चर्मरोग, मेंदु व पोटाचे विकार यासह इतरही आजारावर राज्यभरातुन येणार्‍या तज्ञ डॉक्टरांकडून उपचार, मार्गदर्शन व औषधी वितरण केले जाईल. 
    त्या अनुषंगाने आपल्या कुटुंबातील व्यक्ती, नातेवाईक व गावातील आजारी व्यक्ती गरजू असेल तर अशा रुग्णांची नोंदणी करण्याकरिता प्रयत्न करावा असे आयोजक समितीद्वारा कळविण्यात आले आहे. रुग्णांची नोंदणी आपापल्या गावातील डॉक्टर मंडळी यांच्याकडे नोंद करावी. महासिद्ध अर्बन क्रेडिट सोसायटीच्या सर्व शाखामध्ये सुध्दा रुग्णांची नोंदणी करता येईल. रुग्णांना कुठेही नोंदणी शक्य झाले नाही तर रुग्णाचे नाव, गाव, वय व आजार लिहून सदर यादी महाविद्यालयात जमा करून रुग्णांची नोंदणी करुन शिबीराचा लाभ घ्यावा.
        आज संग्रामपूर तालुका काँग्रेस कमेटी पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या बैठकी चे आयोजण करण्यात आले होते. त्यावेळेस आयोजक डॉ. सौ.स्वातीताई वाकेकर यांनी कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली.
यावेळी संचालन राजेंद्र वानखेडे यांनी केले. 
यावेळी मान्यवर नेते तथा कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments