आमदार रोहितदादा पवार यांच्यावर झालेल्या दडपशाही कार्रवाईचा बुलढाणा जिल्हा राष्ट्रवादीच्या वतीने निषेध - जिल्हा प्रवक्ता अधि. करीम खान
प्रतिनिधी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे युवा आमदार रोहितदादा पवार यांच्यावर ईडीने कार्रवाई करुन आज दिनांक 24 जानेवारी रोजी समन्स देऊन चौकशीला बोलावले. ही कार्रवाई राजकीय सूडातुन झाली असुन भाजपा सरकार भितीतुन अश्या कारवाया करीत आहे त्यामुळे त्याचा जिल्हा राष्ट्रवादीच्या वतीने निषेध करीत असल्याचे बुलढाणा जिल्हा प्रवक्ता एडवोकेट करीम खान यांनी एका निवेदनाद्वारे सांगितले आहे. त्यांनी या निवेदनाद्वारे सांगितले आहेकी, लोकशाहीमध्ये विरोधकाना जनतेचा आवाज बनुन संघर्ष करण्याचा अधिकार असतो, परंतु आजच हे राज्यातल खोके सरकार व केंद्र सरकार विरोधकांचा आवाज दाबन्याच काम करीत आहे. ICE इनकम टैक्स, सीबीआई, ईड़ीची 90-95% कार्रवाई फक्त विरोधकावर होत आहे हे विरोधकांचा आवाज दाबन्याच छड़यंत्र आहे, अश्या भेकड़ कारवायाना राष्ट्रवादीचा कार्यकर्ता भिनार नाही आम्ही आदरनीय शरद पवार साहेब, जयंतराव पाटिल, सुप्रियाताई सुळे यांच्या नेतृत्वात लढत राहु. रोहित पवार यांच्यावर चालू असलेली गैरकायदेशीर कार्रवाई त्वरित थांबवण्यात यावी अन्यथा जिल्ह्यात तीव्र आंदोलन करू व होनाऱ्या परिणामास शासन जबाबदार राहणार असल्याचे आवाहन त्यांनी दिले. या निवेदनावेळी अल्पसंख्याक जिल्ह्याध्यक्ष एम.डी. साबीर, मोहसीन खान, महादेव भालतड़क, ईरफान खान, आशिष वायझोडे, सिद्धार्थ हेलोड़े यांची उपस्थिती होती.
0 Comments