65 वर्षीय वृद्धाने नातवासह केली सुनेची कुऱ्हाडीचे घाव घालीत हत्या... आरोपी वृद्धास केली अटक...
थरारक.....नातू व सुनेची कुऱ्हाडीने वार करून हत्या संग्रामपूर येथे भरदिवसा राहत्या घरात 65 वर्षीय आजोबानेच केली हत्या बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर येथे दि 23 जानेवारी मंगळवार रोजी एका ६५ वर्षीय वयोवृद्ध व्यक्तीने भरदिवसा बाजार दिवशी 10 वर्षीय नातू तसेच सुनेच्या अंगावर कुऱ्हाडीने वार करून हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.....
हत्या करून आरोपीने स्वतःला तामगाव पोलिसांना हत्त्या केल्याची कबुली दिली आहे.... मात्र या घटनेत 10 वर्षीय समर्थ याचा जागीच मृत्यू झाला असून सुन सौं.अश्विनी गणेश गायकी या गंभीरं जखमी झाले असल्याने त्यांना ताबडतोब रुग्णवाहीकेने सईबाई मोटे रुग्णालयात दाखल केले मात्र जास्त गंभीर मार लागला असल्याने त्यांचा सुद्धा शेगाव येथे दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर फिर्यादी दुर्गा देवानंद उर्फ राज गायकी वय 31 वर्ष राहणार आठवडी बाजार संग्रामपूर यांच्या फिर्यादीवरून आरोपी देवानंद गायकी वय 65 वर्ष त्यांच्यावर गुन्हा नोंदवला असून शेतीच्या कारणास्तव मागील चार वर्षांपूर्वी मुलगा देवानंद यांनी चार एकर शेती वर 75 हजार रुपये कर्ज काढल्यामुळे वारंवार आरोपी नारायण भिकाजी गायकी हे घरात वादविवाद करत होते व 23 जानेवारी मंगळवार रोजी आरोपीचे दोन्ही मुले परगावी गेल्या असल्या ची संधी साधून आरोपीने सुनीला व नातू यास कुऱ्हाडीने वार केल्याचा प्रकार उघडी झाला असून
नारायण गायकी असे आरोपीचे नाव असून घटना स्तळी तामगाव पोलिसांनी ताबडतोब धाव घेतली व डी.वाय. एस. पी. गवळी तसेच मलकापूर येथील पथक सुमारे# 5.30 च्या दरम्यान घटना स्तळी पोहचून पंचांनामा केला असून पुढील तपास ....डी.वाय. एस. पी. गवळी यांच्या मार्गदर्शनात तामगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार एपीआय राजेंद्र पवार करीत आहेत
0 Comments