सद्गुरु रामचरणदास महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त अखंड हरिनाम व श्रीमद भागवत कथा सप्ताहाची सांगता
ह भ प प पू सद्गुरु वैकुंठवासी रामचरणदास महाराज आळंद फाटा यांच्या २१ व्या पुण्यतिथी निमित्त आदर्श कॉलनी येथे भक्तीमय वातावरणात आयोजित अखंड हरिनाम व श्रीमद् भागवत कथा सप्ताहाची सांगता काल्याचे किर्तन व महाप्रसादाने झाली .
ह भ प सद्गुरु वैकुंठवासी रामचरणदास महाराज आनंद फाटा यांच्या २१ व्या पुण्यतिथी निमित्त संत सेना महाराज सामाजिक सभागृह आदर्श कॉलनी येथे दिनांक १२ जानेवारी ते दिनांक २० जानेवारी पर्यंत अखंड हरिनाम व श्रीमद भागवत कथेचे आयोजन करण्यात आले होते भागवताचार्य सौ ज्योतीताई इंगळे चिखली यांच्या सुमधुर वाणीमधे भागवत कथा संपन्न झाली . दररोज संध्याकाळी हरिपाठ व दररोज रात्री हरी किर्तन संपन्न झाले हरीकीर्तना मध्ये ह भ प रमेश महाराज जायभाय, ह भ प अतुल महाराज धंदरे, ह भ प विकास महाराज जायभाय, ह भ प सुधाकर महाराज वाघ, ह भ प तुलसीदास महाराज शास्त्री, ह भ प अनिरुद्ध महाराज ह भ प पंढरीनाथ महाराज चाटे यांचे दररोज रात्री हरी कीर्तन झाले . काल्याचे किर्तन ह भ प संत चरणदास निकम गुरुजी यांचे झाले . प्रवचन सावजीसर यांचे झाले . महाप्रसादाने सप्ताहाची सांगता झाली या सप्ताह मध्ये श्री संत गजानन महाराज वारकरी टाळकरी मंडळ ' भजनी मंडळ व पंचक्रोशीतील भक्तगण सहभागी झाले होते . सप्ताहा आयोजन हभप देविदास महाराज खराततथा आदर्श कॉलनी येथील समस्त नागरिक - शहरातील भक्तगण यांनी केले होते या सप्ताहात पंचक्रोशीतील भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते .नगर परिषदेच्या वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले .
0 Comments