जळगाव जामोद तालुका प्रतिनिधी:-
रविवार ला मध्यरात्री प्रमोद काशीराम शेळके वय 46 वर्ष राहणार धरणगाव तालुका मलकापूर जिल्हा बुलढाणा यांचा आसलगाव येथील नवीन पूल बांधकामाच्या बाजूच्या रस्त्यावर अपघाती मृत्यू झाला. जेथे पुलाचे काम चालू आहे तेथे संबंधित विभागाने रोड ड्रायव्हर ड्रायव्हरशन चार बोर्लाड न लावल्यामुळे हा अपघात झाला. त्यांच्या मुलाने फिर्याद दिली असता असे सांगितले की रात्री साडेदहा वाजता धरणगाव येथून कामानिमित्त जळगाव जामोद कडे जात आहे असे सांगितले व निघाले परंतु सकाळ होईपर्यंत ही त्यांची काही माहिती न मिळाल्यामुळे सकाळी व्हाट्सअप ग्रुप वर अज्ञात व्यक्तीचा मृत्यू व फोटो व्हायरल झाले त्यावेळेस आम्ही जळगाव पोलीस स्टेशनला येऊन मृतक पाहण्याची विनंती केली त्यावेळेस आम्हाला सरकारी दवाखान्यामध्ये नेऊन मृतकाची डेड बॉडी दाखवण्यात आली त्यावेळेस आम्ही ओळखले की हे माझेच वडील आहेत. 304 अ नुसार गुन्हा नोंदवुन दाखल करण्याची प्रक्रिया वृत्तलेपर्यंत सुरू होती यामध्ये तपास अधिकारी म्हणून सपोनी पांडुरंग इंगळे हे पोलीस स्टेशन जळगाव जामोद चे ठाणेदार महाजन साहेब यांच्या मार्गदर्शनात करत आहेत
0 Comments