प्रतिनिधी .स्थानिक दस्तुर रतनजी ग्रंथालय येथे सर्वप्रथम सरस्वती पूजन करून व कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री विठ्ठलराव लोखंडकार व संस्थेचे उपाध्यक्ष श्री शशिकांत भारंबे यांनी सविस्तर त्यांच्या जीवनाबद्दल सांगितले रत्नजडित अभंग ओवी अमृताची सखी चारी वर्ण तुम्ही फिरे सरस्वतीची पालखी आज मराठी भाषा दिन आपण साजरा करत आहोत कवी कुसुमाग्रज म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर यांच्या जन्मदिन मराठी भाषा दिन म्हणून 2013 पासून साजरा करण्यात येतो. मराठी भाषेला महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रात ज्ञान भाषा होण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले होते त्यांच्या या क्षेत्रातील योगदान महत्त्वपूर्ण असल्याने ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या विवा उर्फ कुसुमाग्रज यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी आजचा दिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. आपल्या महाराष्ट्रात नवे भारतात हिंदी ही 25% बोलली जाते तर त्यानंतर बंगाली या भाषेचा नंबर लागतो आणि त्यानंतर आपल्या मराठी भाषेचा तिसरा क्रमांक लागतो सात पूर्णांक एक दशांश इतके टक्के लोक मराठी भाषा बोलतात त्यानंतर तामिळ व त्यानंतर तेलगू अशा भाषांचा नंबर लागतो मराठी भाषा ही पंधराशे वर्षे जुनी भाषा आहे लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहले खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म पंथ जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी माझ्या मराठीची बोलू कौतुके परी अमृतातही पाहिजे जिंके हे ज्ञानेश्वर महाराजांची युक्ती आहे म्हणजे मराठीचा एवढा गौरव आहे की त्यापुढे अमृतही फिके आहे आपल्यालाही खरोखर अभिमान वाटावा की खामगावच्या सांस्कृतिक जडणघडणीत मराठी भाषेच्या संवर्धनाकरीता दस्तुर रतनजी ग्रंथालयाचे मोलाचे योगदान आहे आणि 134 वर्षापासून नियमित पणे सुरू असलेल्या या ग्रंथालयाच्या आणि ग्रंथ दानाचे जे महत्त्व आहे त्याच्या पालखीचे भोई बनण्याचा आपल्याला मान मिळालेला आहे "मराठी भाषा असे महाराष्ट्राची शान" वाचन मनन भजन करताना हरपते भान "
काना मात्रा वेलांटी उकाराचे मिळाले वाण"
" अलंकृत आपली भाषा वाढव तिचा सन्मान"
खरोखर मराठी भाषा जी आहे ती अलंकारांनी नटलेली आहे म्हणजे त्याच्यात काना मात्रा वेलांटी उकार स्वर्ग विसर्ग अनुस्वार हे जणू मराठी भाषेला मिळालेले दागिनेत आहे अशा या महाराष्ट्रात आपला जन्म झालेला आहे त्याबद्दल आपल्याला खरोखर अभिमान वाटावा अशी परिस्थिती आहे .या वेळी उपस्थित सचिव अनंत वनारे, यांनी सर्वांचे आभार मानले सहसचिव गजानन आखरे, संचालक वसंतराव बेलोकार, राजेंद्र वानखडे, श्रीकांत वैद्य, चंदन कौशल्य, सचिन तांबट तसेच कर्मचारी वृंद ग्रंथपाल राधिका ढोरे सहग्रंथपाल मंगेश बदरखे, लिपिक लताताई विंचू, सेवक रवींद्र खराटे ,सभासद आणि इतर सभासद ,वाचक मोठ्या संख्येत उपस्थित होते .
0 Comments