डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे गाणे का लावले नाही याचा जाब विचारणाऱ्या विद्यार्थ्यांनी च्या काकूला मारहाण करून शाळे बाहेर केले ओढत नेवून हाकलून दिलेआरोपी विरुद्ध ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल
प्रतिनिधी चंद्रभान झिने देऊळगाव राजा
प्रजासत्ताक दिनानिमित्त मातृतीर्थ सिंदखेडराजा तालुक्यातील देऊळ कोळ येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत नियोजित डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे गाणे न वाजविता दुसरेच गाणे लावले आणि विचारले असताना विद्यार्थिनी सुजाता गौतम मोरे हीच्या काकूला शाळेच्या आवारात च मारहाण करून ढकलत नेवून शाळेच्या बाहेर हाकलून दिल्याची घटना 26 जानेवारी रोजी देऊळ गाव कोळ या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत घडली असल्याने ज्योती गौतम मोरे यांच्या तक्रारीवरून बिबी पोलीस स्टेशन लां आरोपी शाळा समिती अध्यक्षउद्धव कायंदे,सरपंच अशोक कायंदे व शिक्षक नागरे सर यांच्या विरुद्ध ॲट्रॉसिटी एक्टनुसार गुन्हा दाखल झाला असून अजून आरोपीला अटक करण्यात आली नाही.
हया घटनेची माहिती मिळताच सामाजिक नेते, पंडितराव खंदारे ,भाई दिलीप खरात, ब्रम्हा पाडमुख, भाई भिकाजी इंगळे, वंचित चे सिंदखेड राजा तालुकाध्यक्ष मधुकर शिंदे, ऑल इंडिया पँथर जिल्हाध्यक्ष भाई अमित काकडे, वंचित चे लोणार तालुका अध्यक्ष दिलीप राठोड, प्रताप लिहिणार ,सुनिल इंगळे यांच्या सह प्रंचड जनसमुदाय बिबी पोलीस स्टेशन ला जमला होता
याबतीत सविस्तर असे की
सिंदखेडराजा तालुक्यातील देऊळगाव कोळ येथील ज्योती गौतम मोरे वय 30 वर्षे यांनी बिबी पोलीस स्टेशनला तक्रार दिली की माझे पती गौतम मोरे मोठा मुलगा प्रेम गौतम मोरे, राम मोरे ,व हर्षवर्धन मोरे यांचे सह वरील ठिकाणी राहते व मजुरीचे काम करते देउळगाव कोळ गावात जिल्हा परिषदेची इयत्ता सातवी पर्यंत शाळा आहे त्या शाळेमध्ये माझी पुतणी सुजाता प्रमोद मोरे ही शिकत असून यावर्षी दिनांक 26जानेवारी रोजी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात शाळेत . माझी जाऊ रुक्मिलाबाई प्रमोद मोरे ची मुलगी सुजाता प्रमोद मोरे वय 9 वर्ष हिने प्रजासत्ताक दिनी सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेतला असता तिला तिचे शिक्षक नागरे सर व पालवें सर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे गाणे सोन्याने भरले ओटी हे गाणे घेतले होते व त्याची पंधरा दिवसापासून नागरे सर व पालवे सर प्रॅक्टिस करत होते आज दिनांक 26 जानेवारी रोजी सकाळी 7.30 वाजता झेंडावंदन झाल्यानंतर शाळेतील भाग घेतलेल्या मुलांचा सांस्कृतिक कार्यक्रम 8.30 वाजता दरम्यान सुरू झाला त्यानंतर सात ते आठ मुलांचे कार्यक्रम पार पडले व अंदाजे 11.00 वाजता दरम्यान माझी पुतणी नामे सुजाता प्रमोद मोरे हीच्या गाण्याचा नंबर आला तेव्हा साऊंड वाला इंदल भाऊराव राठोड यांनी अंबाबाईचे गाणे सुरू केले तेव्हा मी नागरे सर व पालवें सर यांना विचारले की माझ्या पुतनीने तर सोन्याने भरली ओटी हे गाणे दिले होते त्या गाण्यावर तुम्ही तिची प्रॅक्टिस करून घेतली आणि आता तर तुम्ही अंबाबाई चे गाणी वाजवत आहात असे बोलत असताना नागरे सर मला म्हणाले की तुमच्या जातीचे लोक असेच करतात असे म्हणाला तेवढ्यात शाळा कमिटीचे अध्यक्ष उद्धव कांयदे हे मध्येच येवून बोलू लागला व माझ्या जवळ येवून माझ्या गालावर त्यांनी येवून चापट मारली असता त्या ठिकाणी अशोक कायदे सुद्धा माझ्या जवळ आली व म्हणाला की गेल्या वर्षीच तुम्ही या कार्यक्रमात असाच गोंधळ केला होता तुम्ही महार जास्त माजले आहेत असे म्हणून माझे केस पकडले त्यामुळे त्यांच्या हाताचे नखें मला लागले तसेच त्यांनी मला मारहाण करून मला खाली पाडले तसेच अशोक कांयदे आणि उद्धव कायंदे यांनी मला शाळेच्या बाहेर ओढत नेऊन बाहेर हाकलून दिले माझे गळ्यातील सोन्याचे डोरले साडेसात ग्रामचे मनी या दरम्यान कुठेतरी खाली पडले आहे याबाबत ची सविस्तर तक्रार बिबी पोलीस स्टेशनला दिली यावरून बिबी पोलिसांनी सदर शाळा समिती अध्यक्ष उद्धव कायंदे ,सरपंच अशोक कायंदे शाळेवरील शिक्षक नागरे सर यांच्या विरुद्ध. ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार 354,323,504,506,34,3(1)r , 3,(1,)s,,3(1)u,3(1)w(i),3(1)w(ii),3(2)(va)आरोपी विरुद्ध भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी पाटील यांच्या मार्गदर्शानाखाली ठाणेदार सदानंद सोनकांबळे करत आहेत
0 Comments