मलकापूर प्रतिनिधी
मलकापूर: छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवानिमित्त प्राध्यापक शाहीर अजिंक्य लिंगायत छत्रपती संभाजी नगर प्रस्तुत जागर शिवशाहीचा अर्थात इतिहास, वर्तमान आणि भविष्याची सांगड घालत शिवचरित्रावर आधारित शाहिरी पोवाडयांचा प्रेरणादायी कार्यक्रम तालुक्यातील मौजे दसरखेड येथे आज २१ फेब्रुवारी बुधवार रोजी संध्याकाळी सहा वाजता आयोजित करण्यात आला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या वास्तव्याने आणि पराक्रमाने पवन झालेल्या दुर्गराज रायगडापासून ते संबंध भारतभर शाहिरी पोवाडयांचा गाजलेला कार्यक्रम, छत्रपती शिवरायांचे कर्तृत्व, संस्कार, पराक्रम यासोबतच उत्तम प्रशासक, प्रगतशील विचार, सुसंस्कारित आचार अशा अष्टपैलू व्यक्तिमत्व, शिवकालीन संस्कृती आपल्या परंपरा, लोककला, गडकिल्ले, शस्त्रास्त्र, युद्धनीती, परिचित-अपरिचित, योद्धे अशा विविध विषयांवर आधारित शाहिरी, पोवाडे, कवने, शिवगीत स्फूर्तीगित, सामाजिक गीते असा प्रबोधनातून मनोरंजन करणारा भव्य दिव्य असा धगधगता अस्सल संगीतमय शाहिरी नजराणा म्हणजेच इतिहास वर्तमान आणि भविष्याची सांगड घालीत शिवचरित्रावर आधारित शाहिरी पोवाडयांचा यांचा प्रेरणादायी कार्यक्रम अर्थात जागर शिवशाहीचा हा कार्यक्रम दसरखेड येथे आयोजित करण्यात आला आहे. तरी या कार्यक्रमाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा दैदिप्यमान इतिहास अनुभवाला मलकापूर तालुका व शहरातील शिवप्रेमी बंधू-भगिनींनी आवर्जून दसरखेडला यावे असे आवाहन आयोजक शिवसेना तालुका प्रमुख तथा बाजार समितीचे संचालक विजय साठे, कामगार सेना तालुका प्रमुख संतोष साठे व शिवराज हेल्थ क्लब दसरखेड च्या वतीने करण्यात आले आहे.
चौकट : जागर शिवशाहीचा या कार्यक्रमात किशोर धारासुरे, अनुराधा पांचाळ, ऋतिक चव्हाण, भक्ती मालुरे, प्रचिती हतेगावकर, कृष्णा वाघ,जगदीश जाधव, अनुज हरणे, रवी जाधव या नामवंत शाहिरांसोबतच प्रस्तुत युवा शाहीर शुभम केंद्रे यांचा प्रामुख्याने सहभाग राहणार आहे.
0 Comments