प्रतिनिधी नागेश सुरंगे
आज दिनांक २०/०२/२०२४ रोजी तहसील माननीय तहसीलदार मॅडम यांना शहरातील दिव्यांग बांधवां च्या वतीने निवेदन देण्यात आले त्यानुसार अंतोदयाचा जि आर (GR)जवळपास 4 वर्षे होत आहे. आणि तेव्हापासून बऱ्याच दिव्यांग व्यक्तींना अंतोदय रेशन कार्ड साठी अर्ज केला परंतु आज पर्यंत एकही दिव्यांगाला अंतोदयचा रेशन कार्ड दिले नाही आहे सदर अर्जाची विचारपूस केली असता मध्ये अर्ज केला असता ते म्हणतात की ही योजना शहरासाठी नाही आहे फक्त ग्रामीण भागासाठी आहे असे म्हणतात. त्यांच्यामध्ये टाळामेळ असताना काही दिसत नाही मा. तहसीलदार मॅडम काय म्हणते तर पुरवठा विभागातील साहेब वेगळच काय म्हणतात. अक्षरशः अपंगाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न तहसील विभागामध्ये व पुरवठा विभागामध्ये होताना आपला दिसतो. अंतोदय रेशन कार्ड बाबतचा GR त्यांना दाखवला तर म्हणतात की हा GR नाही आहे आमच्याकडे वेगळा जीआर आहे. याचा अर्थ असा की ते लोक अपंगाची दिशाभूल करतात.
या दृष्टीने आज मा.तहसीलदार मॅडम यांना शहरातील सर्व दिव्यांनी बांधवांच्या वतीने निवेदनन देण्यात आले. त्यावेळी दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments