सातपुडा शिक्षण संस्था, जळगाव जामोद द्वारा संचालित व डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला संलग्नित, स्वातंत्र्यवीर गणपतराव इंगळे कृषी महाविद्यालय, उद्यानविद्या महाविद्यालय तसेच कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, जळगाव जामोद यांच्या संयुक्त विद्यमाने ग्राम सखारामपुर चावरा-इलोरा येथे राष्ट्रीय सेवा योजना *शाश्वत विकासासाठी युवक* या संकल्पने वर आधारित श्रमसंस्कार विशेष शिबिर दि.6 ते 12 फेब्रुवारी 2024 या कालावधीत आयोजित करण्यात आले होते.
दि.12 फेब्रुवारी 2024 रोजी राष्ट्रीय सेवा योजनेचा *समारोपीय कार्यक्रम* झाला. श्रमसंस्कार विशेष शिबिराचा दरम्यान ग्राम चावला इलोरा आणि सखारामपुर या तीनही गावांमध्ये विविध सामाजिक विषयांवर भाष्य करणारे पथनाट्य, नारे, नाटक घोषणा, गजर यांच्या स्वरूपामध्ये प्रबोधनपर जनजागृती करण्यात आली. 130 जनावरांचे लम्पि व तोंड आणि पाय खुरीचे लसीकरणाचा कार्यक्रम यावेळी आयोजित करण्यात आला होता, गावातील जनावरांचे लसीकरण झालं पाहिजे, लम्पि रोगाविरुद्ध लढा देऊन आपल्या जनावरांना सक्षम आणि कार्यक्षम बनवले पाहिजे यासाठी जनजागृतीचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. सोबतच काही बौद्धिक सत्रांचे सुद्धा आयोजन केला करण्यात आले. यामध्ये शाश्वत शेती भूजल पातळी खालवण्याची कारणे तसेच भारतीय तरुणांपुढील आव्हाने, ज्ञानेश्वरीतून ज्ञानप्राप्ती, एड्स जनजागृती आणि समुपदेशन आणि स्वयंसेवकांचे एचआयव्हीचे चाचणी यावेळी करण्यात आली. गावांमध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची सुद्धा रेलचेल होती. हा सादरीकरणाचा कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आयोजित करण्यात आला. यामध्ये विविध गाण्यांवरचे नृत्य व काही नाटके अंधश्रद्धा, व्यसनमुक्ती, दारूबंदी या विषयांवर भाष्य करणारे संगीत नाटक यांचा सुद्धा यामध्ये समावेश होता. या शिबिरामध्ये लहान मुलांचे आरोग्य तपासणीचे शिबिर सुद्धा आयोजन करण्यात आले होते. येथील श्री संत श्रीराम महाराज विद्यालयाचे विद्यार्थी आणि गावातले काही लहान मुले असे मिळून एकूण 127 लहान मुलांचे आरोग्याची तपासणी, सोबतच त्यांची वजन आणि उंची तपासणी करण्यात आली. या सर्व एका आठवड्याच्या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टिकोनातून स्वयंसेवकांनी विशेष प्रयत्न केले. आज या शिबिराच्या समारोपिय कार्यक्रमासाठी जळगाव जामोद तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष श्री.राजेश सित्रे पाटील, ग्राम चावरा-ईलोराचे पोलीस पाटील श्री.गोविंदा लादे, श्री.सुनील पाटील मोरखडे, श्री.दिगंबर पाटील तिजारे तसेच कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.योगेश गवई, उद्यानविद्या महविद्यालयचे उपप्राचार्य प्रा.सतिश धर्माळ, प्रा.शामदास बैरागी याठिकाणी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.योगेश गवई यांनी समारोपीय कार्यक्रमात बोलताना विद्यार्थी हा आपल्या महाविद्यालयाचाच नव्हे तर आपल्या विद्यापीठाचा ब्रँड अँबेसिडर आहे असे त्यांनी संबोधले. पथनाट्य आणि वेगवेगळ्या समाज उपयोगी कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण समाजामध्ये जी जनजागृती करत आहात ते खरंच विशेष उल्लेखनीय आहे, या वयांमध्ये आपल्या सर्वांगीण विकास व्हावा यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वयंसेवक होणे ही अतिशय गौरवाची बाब आहे, नियमित कार्यक्रमांमधून शिबिरासाठी आपले निवड होणे हे तितकेच महत्त्वाचे आहे जितके आपण शिबिरामध्ये आल्यानंतर या गावांमध्ये श्रमदान, पथनाट्य आणि सामाजिक विषयांवर भाष्य करणारे वेगवेगळे उपक्रम राबवतो. यामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वयंसेवक हा केंद्रबिंदू मानून आपण त्यांच्या या शक्तीचा आणि ऊर्जेचा समाजाचा सर्वांगीण विकास घडविण्यासाठी, संदेश पोहोचवण्यासाठी कसा वापर करू शकतो हे या राष्ट्रीय सेवा योजनेचे माध्यमातून दिसून येते.
राष्ट्रीय सेवा योजनेच्या श्रमसंस्कार शिबिरामध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.अविनाश आटोळे, डॉ.अनिकेत उमाळे व प्रा.दत्ता तायडे सोबतच प्रा.प्रमोद डव्हळे यांनी विशेष प्रयत्न केले. समारोपीय कार्यक्रमात प्रा.कु.अनुराधा चोपडे, प्रा.कु.प्रगती टांगले आणि प्रा.कू.प्रेरणा कुटे यांनी परिश्रम घेतले.
0 Comments