Advertisement

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार ) पक्षाच्या वतीने जळगाव जामोद येथे भीमजयंती दिनी भाजपाला सत्तेपासून रोखण्यासाठी शपथ

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार ) पक्षाच्या वतीने जळगाव जामोद येथे भीमजयंती दिनी भाजपाला सत्तेपासून रोखण्यासाठी शपथ
प्रतिनिधी जळगाव जामोद
          आज 14 एप्रिल 2024 रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार ) पक्षाच्या जळगाव जामोद व संग्रामपुर तालुक्यातील पदाधिकारी यांच्या वतीने राष्ट्रवादी नेते प्रसेनजीत पाटिल यांच्या नेतृत्वात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जळगाव जामोद येथील भिमनगर येथे अभिवादन करण्यात आले. सोबतच संविधान बदलु पाहणाऱ्या भाजपाला रोखण्यासाठी आम्ही आज राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या समक्ष शपथ घेतो की, भारतीय जनता पार्टी आज तानाशाही मार्गाने वाटचाल करीत आहे. भारतीय संविधान बदलण्याचे भाजपाचे मनसुबे आहेत. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार ) पक्षाचे कार्यकर्ते हे मनसुबे मोडीत काढण्यासाठी कटीबद्ध आहोत व त्यासाठी पूर्ण ताकदिनीशी महाविकास आघाडी सोबत राहणार असल्याची शपथ घेण्यात आली. यावेळी प्रसेनजीत पाटिल,एम.डी.साबीर, विश्वास भालेराव, प्रमोद सपकाळ,संजय मारोडे,नारायण ढगे, अरुण निंबोळकार,श्रीकांत काठोळे, ईरफान खान, संजय ढगे,मोहसीन खान, अरुण मुरुख,अशोक गवळी, भास्कर येऊल, आशिष वायझोडे, पुंडलीक भिवटे, रमेश मारोडे,विठ्ठल वाघ, दत्ता डिवरे,विठ्ठल घुले, अतांउल्लाह पठान, निजाम राज, ताहेर माही,विवेक दिंडोकार यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments