Advertisement

रावेर लोकसभा मतदार संघाचा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर,

रावेर लोकसभा मतदार संघाचा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, 
मलकापूर विधानसभा मतदार संघामध्ये आचारसंहिता अंमलबजावणीकरीता प्रशासन सज्ज.

 मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे
मलकापूर:- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची आचारसंहिता घोषित झालेली आहे. त्यानुसार रावेर लोकसभा मतदार संघांतर्गत मलकापूर विधानसभा मतदार संघामध्ये दिनांक 13/05/2024 रोजी मतदान होणार आहे. 21- मलकापूर विधानसभा मतदार संघामध्ये मलकापूर व नांदुरा तालुक्याचा समावेश होतो. 21- मलकापूर विधानसभा मतदार संघात एकूण 304 मतदान केंद्र असून, त्यापैकी ग्रामीण भागात 214 मतदान केंद्र असून, शहरी भागात 90 मतदान केंद्र आहेत. 04-रावेर लोकसभा मतदार संघाचा निवडणूक कार्यक्रमानुसार दिनांक 18/04/2024 ते 25/04/2024 पावेतो नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा कालावधी आहे. मतदान दिनांक 13/05/2024 रोजी सकाळी 7:00 ते सायंकाळी 6:00 या कालावधीत होईल. 21 मलकापूर विधानसभा मतदार संघामध्ये दिनांक 23/01/2024 रोजी प्रसिध्द झालेल्या मतदार यादी नुसार पुरुष 1,45,843 स्त्री 1,32,231, तृतीयपंथी 6, असे एकूण 2,78,080 मतदार आहेत. त्यापैकी मलकापूर तालुक्यात पुरुष मतदार 72184, स्त्री मतदार 66513 तृतीय पंथी मतदार 04 असे एकुण 138701 व नांदुरा तालुक्यात पुरुष मतदार 73659, स्त्री मतदार 65718 तृतीय पंथी मतदार 02 असे एकुण 139379 असे मतदार आहेत. 21 मलकापूर विधानसभा मतदार संघात एकूण 2502 दिव्यांग मतदार व 85+ मतदार 3171 आहेत. त्यापैकी दिव्यांग मतदार 84 व 224 वयोवृध्द 85+ मतदार असे एकूण 308 मतदारांनी गृह मतदाना करीता टपाली मतपत्रिका मिळणे बाबत अर्ज दिलेले आहेत. एकूण 307 मतदारांचे टपाली मतपत्रिकेव्दारे गृह मतदान होणार आहे. त्याकरीता एकूण 15 मतदान पथकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 50 टक्के मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग करावयाची असल्याने 21 मलकापूर विधानसभा मतदार संघामध्ये वेबकास्टींगसाठी 152 मतदान केंद्र निश्चित करण्यात आलेले आहेत. आचार संहितेची अमंल बजावणी करण्या करीता 7 फिरते पथक, 7 स्थिर सर्वेक्षण पथक, 4 फिरते व्हीडीओ सर्वेक्षण पथक, । व्हीडीओ पाहणी पथक, 2 खर्च निरीक्षण पथक यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. रणथम, जांबुळधाबा, धुपेश्वर, दाताळा, अंभोडा, येरळी व तरवाडी या 7 ठिकाणी तपासणी नाके उभारण्यात आलेले आहेत. आचारसंहिता अंमलबजावणीकरीता सीविजिल अंतर्गत प्राप्त होणाऱ्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आलेला असून, 24X7 अधिकारी/कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आलेली असून सदर नियंत्रण कक्षाचा संपर्क क्र. 942071287 हा आहे.लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीचे कामकाज पार पाडण्या करीता 21 मलकापूर विधानसभा मतदार संघामध्ये एकूण 30 क्षेत्रीय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे मतदानाची प्रक्रिया पार पाडण्याकरीता एकूण 1388 मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तसेच एकूण 53 सुक्ष्म निरीक्षक यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सदर मतदान पथकांना ने-आण करण्यासाठी 32 बस, 12 मिनी बस, व 18 जीप निश्चित करण्यात आलेल्या आहेत. सदर मतदान साहित्याचे वितरण व संकलन हे कृषी उत्पन्न बाजार समिती, मलकापूर नविन मार्केट यार्ड बेलाउ येथून करण्यात येणार आहे.
(2) महिला मतदारांची नोंदणी वाढावी तसेच तरुण मतदारांचे प्रमाण वाढावे याकरीता स्वीप अंतर्गत 21- मलकापूर विधानसभा मतदार संघामध्ये शाळा, महाविदयालांमार्फत जनजागृती करण्यात येत आहे. त्यामुळे महिलांचे मतदार यादीतील प्रमाणे 898 वरुन 909 इतके झाले आहे. मतदानाची टक्केवारी वाढावी याकरीता मागील निवडणूकीमध्ये मतदानाची कमी टक्केवारी असलेल्या मतदान केंद्रांच्या ठिकाणी मतदार जनजागृतीकरीता विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. तसेच शहरातील वर्दळीचे ठिकाणी व महसूल मंडळांचे ठिकाणी मतदार जनजागृतीचे बॅनर, पथनाटये, रॅलीज्, रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, मानवी साखळीचे संदेश, इत्यादी प्रकारे कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत.
सदर निवडणूकीचे कामकाज निवडणूक निर्णय अधिकारी अंकुश पिनाटे अपर जिल्हाधिकारी जळगांव, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संतोष शिंदे उपविभागीय अधिकारी, मलकापूर यांचे मार्गदर्शनाखाली राहुल तायडे, तहसिलदार मलकापूर, डि.एल. मुकुंदे, तहसिलदार नांदुरा, जिवन मोराणकर, अपर तहसिलदार नांदुरा, प्रविण घोटकर, नायब तहसिलदार मलकापूर, देवेंद्र कु-हे, नायब तहसिलदार मलकापूर, श्रीकृष्ण उगले, नायब तहसिलदार मलकापूर, डी.एम. रायबोले, नायब तहसिलदार मलकापूर, एस.एम. चव्हाण, नायब तहसिलदार नांदुरा, हरीष गुरव, नायब तहसिलदार नांदुरा, आरती नारखेडे, नायब तहसिलदार नांदुरा, पि.एस. थोरात, निरीक्षण अधिकारी नांदुरा, सर्व क्षेत्रिय अधिकारी व कर्मचारी करीत आहेत. 21 मलकापूर विधानसभा मतदार संघामध्ये दिनांक 13/05/2024 सोमवार रोजी सकाळी 7 ते सायंकाळी वाजेदरम्यान मतदान होणार आहे. तरी सर्व मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावुन लोकशाही बळक्ल करण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी संतोष शिंदे यांनी केले आहे

Post a Comment

0 Comments