Advertisement

विनोबा अँपमध्ये बुलढाणा जिल्हास्तरीय पोस्ट करणारे विजेते झाल्याबद्दल सारंगधर बांगर सर यांचा सत्कार

विनोबा अँपमध्ये बुलढाणा जिल्हास्तरीय पोस्ट करणारे विजेते झाल्याबद्दल  सारंगधर बांगर सर यांचा सत्कार
प्रतिनिधी जळगाव जामोद 
जिल्हा परिषद केंद्रीय मराठी प्राथमिक शाळा वडशिंगी येथे कार्यरत असणारे शिक्षक  सारंगधर जाणुजी बांगर सर यांचा ओपन लिंक फौंडेशन द्वारा संचलित "विनोबा अँप" मध्ये बुलढाणा जिल्ह्यातील एप्रिल 2024 मध्ये सर्वाधिक शैक्षणिक व्हिडिओ पोस्ट करणारे विजेते शिक्षक म्हणून विनोबा अँप च्या टीमने घोषित केल्याबद्दल वडशिंगी येथील सामाजिक कार्यकर्ते कैलास भगत यांनी सारंगधर बांगर सर यांचं शाल, श्रीफळ, आणि पुष्पहार देऊन सत्कार केला.

या सत्कार कार्यक्रमप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य  विजयभाऊ सातव, शाळा व्यवस्थापन समिती चे माजी अध्यक्ष  वकीलखा महेबूबखा,महादेव वरणकार, शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक विजय म्हसाळ सर,श्रीकृष्ण भटकर सर,अनिल भगत सर उपस्थित होते.

वडशिंगी शाळेच्या शिरपेचात बांगर सरांच्या या कार्याने आणखी मानाचा तुरा रोवला गेला आणि वडशिंगी शाळेचे आणि गावाचे नाव जिल्हाभर झाले ही वडशिंगी गावासाठी आणि जळगांव तालुक्यासाठी अभिमानाची बाब आहे असे मत सामाजिक कार्यकर्ते  कैलास भगत आणि व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments