जळगांव (जा):- वंचित बहुजन आघाडी चे सर्वेसर्वा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस १० मे हा स्वाभिमानी दिवस म्हणून साजरा करण्यात येत असतो म्हणून बाळासाहेबांच्या ७१ व्या वाढदिवसा निमित्त 'भव्य रक्तदान शिबिर व मोफत नेत्र शस्त्रक्रिया शिबीर' आयोजित करून श्रद्धेय बाळासाहेबांचा जन्मदिन 'लोकउपयोगी' उपक्रमाने साजरा करण्याचे योजिले म्हणून दिनांक ११ मे रोजी वंचित बहुजन युवा आघाडी पिंपळगांव काळे च्या वतीने भव्य रक्तदान शिबीर व नेत्र शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला उन्हाळ्याचे दिवस असुनही शिबिरात २५ रक्तदात्यांनी रक्तदान केले व १०० रुग्णांची नेत्र तपासणी व २० रुग्णांची नेत्र शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली या शिबिरात खामगांव सामान्य रुग्णालयातील रक्त पेढी विभागातील वैद्यकीय चमू ने मोलाचे सहकार्य केले विशेष करून डॉ. कैलास काळे, डॉ.विवेक तिडके, डॉ.रहिमान खान यांचे सहकार्य लाभले या शिबिरात वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष अनिल वाकोडे, युवा जिल्हा उपाध्यक्ष गौतम इंगळे, युवा सुपडा बांगर, युवा ता.अध्यक्ष शेगाव उमेश इंगळे, मा.ता.अध्यक्ष रतन नाईक, ता.उपाध्यक्ष सुनिल बोदळे, देवा दामोदर, ज्ञानेश्वर कोकाटे, संचालक कृ.उ.बाजार समिती प्रशांत अवसरमोल, श्रीराम भिडे, संतोष पवार, बळीराम बोरे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते तसेच या शिबिराचे आयोजक प्रकाश भिसे जिल्हा महासचिव वंचित बहुजन युवा आघाडी बुलढाणा अशोक गवई, मयूर अवचार, आर्यन बांगर, अमोल गवई, प्रकाश अवचार, जगदीश गवई, अनिरुध्द गवई, यशवंत अवचार, अनिकेत बांगर, दीपक राऊत, सूरज अवचार,राहुल वानखडे, ऋतिक तायडे, अमोल अवचार, आकाश गवई,रामेश्वर बांगर आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता मेहनत घेतली.
0 Comments